लाल किल्ल्यावर ‘तो’ झेंडा फडकवणारा दीप सिंधु भाजपचा कार्यकर्ता? वाचा खरं काय…

नवी दिल्ली | केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी मंगळवारी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली. यादरम्यान लाल किल्ल्यात आंदोलकांनी प्रवेश केला आणि तेथील खांबावर झेंडा लावला. यावेळी त्याठिकाणच्या गर्दीत दीप सिंधु नावाचा तरुण उपस्थित होता. या तरुणाचा भाजपसोबत संबंध जोडण्यात आला आहे.

रॅली दरम्यान आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसून आले. ठरलेल्या मार्गावरुन न जाता आंदोलकांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला आणि तिथील खांबावर आपला झेंडा लावला. याप्रकारणी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमुळे आता चर्चांना उधाण आले आहे.

या व्हिडीओत लाल किल्ल्यावर आंदोलक शेतकरी संघटनांचे झेंडे लावताना दिसत आहेत. त्याठिकाणी उपस्थित एक तरुण घोषणा देताना पाहायला मिळतो आहे.  शेतकऱ्यांच्या गर्दीत घोषणा देणारी या तरुण व्यक्तीचं नाव दीप सिंधु असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, या व्हिडीओतील तरुण दीप सिंधु याचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुरुदासपुरचे भाजप खासदार सनी देओल यांच्यासोबत दिसत आहे. हा दीप सिंधु हा कोणत्या संघटनेचा कार्यकर्ता आहे ही माहीती अद्याप समोर आली नाही. तसेच तो भाजप खासदार सनी देओल यांचा निकटवर्ती असल्याचे बोलले जात आहे.

 

काँग्रेसचे नेते तहसीन पूनावाला यांनी त्यांच्या ट्विटरवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो तरुण लाल किल्ल्याच्या गर्दीत घोषणा देत असल्याचे दिसत आहे. तहसीन यांनी यावर आरोप केला आहे.

ते म्हणाले, सरकारनेच आंदोलकांना लाल किल्ल्याकडे वळवण्यासाठी दीप सिंधु याला या आंदोलनात सहभागी केलं आहे. लाल किल्ल्यावर जो प्रकार घडला गोंधळ झाला त्यासाठी शेतकरी नव्हे तर सरकारने घुसवलेले लोक यासाठी जबाबदार आहेत. असा घणाघाती आरोप तहसीन पूनावाला यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘जर आंदोलन चिरडले तर त्याचे परिणाम गंभीर होतील’; शरद पवारांचा मोदी सरकारला थेट इशारा
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, धक्कादायक पद्धतीने दोघांचा मृत्यू
…तर दिल्लीतील हिंसा रोखता आली असती; संजय राऊतांनी केले मोठे विधान
शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणावर शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.