आदित्य ठाकरेंसाठी शिवसेनेने ‘हा’ मतदारसंघ काॅंग्रेसला बहाल केला; विधानसभेसाठी झालेली सेटींग उघड

माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. ‘विलासराव देशमुख यांचे सुपुत्र धीरज देशमुख लातूर ग्रामीणमधून, तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे वरळीतून निवडून यावेत, म्हणून समझोता झाला’ असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना व भाजपा यांची युती होती. यावेळी काँग्रेसने दिवंगत, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख यांना उमेदवारी दिली होती. धीरज देशमुख यांचा घवघवीत मताधिक्याने विजय झाला होता. या निवडणुकीत शिवसेना व काँग्रेसने फिक्सिंग केल्याचा आरोप निलंगेकरांनी केला आहे.

“लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेने मुंबई येथील एका जागेसाठी फिक्सींग केली होती. तेथे दोन नंबरवरती ‘नोटा’ राहिले. त्यामुळे मतदारांचा अनादर शिवसेनेने केला आहे.” असा गौप्यस्फोट पाटलांनी केला आहे.

“लातूर ग्रामीणची जागा अमित देशमुख यांना देवून देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीचा खुन केला. ही जागा भाजपकडे होती. ऐनवेळी ही जागा सेनेला सुटली. या जागेसाठी सेनेने दिलेला उमेदवार प्रचाराला फिरकला देखील नाही.” असाही आरोप त्यांनी केला आहे.

“हे राजकारणातले सेटींग आहे. अमित देखमुख यांचे बंधू धीरज देशमुख यांनी ही जागा लढवली आणि विजयी झाले. मात्र, हा विजय कमालीचा एकतर्फी होता. फडणवीसांनी लातूर ग्रामीणची भाजपची विनिंग सीट शिवसेनेला सोडून धीरज देशमुख यांना आमदार केलं”. ही राजकारणातली सर्वात मोठी फिक्सिंग असल्याचाआरोप निलंगेकर यांनी केला आहे.

दिल्ली हिंसाचारातील ‘व्हिलन’ दीप सिध्दूचा फेसबुक लाइव्ह वरून शेतकरी नेत्यांना इशारा

‘’मुंबईचा कर्नाटकात समावेश होत नाही तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करा’’

भाजपच्या वेबसाईटवर खा. रक्षा खडसेंचा लाजिरवाना उल्लेख; वाचून तुम्हालाही संताप येईल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.