‘पाच रुपयांहून झाला होता अपमान; थोडे पैसे उसने घेऊन व्यवसाय केला सुरू, आज लाखोंची उलाढाल’

 

सोलापूर | अनेकदा एखादा व्यवसाय सुरू करायचा म्हटले तर सगळ्यांसमोर मोठमोठी आव्हाने उभी राहिलेली असतात. पण तुमच्यात जर जिद्द असेल तर तुम्ही तुम्हाला हवे ते मिळवू शकतात. सोलापूरच्या स्वाती ठोंगे यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे.

घरातली परिस्थिती बेताचीच रूढी परंपरेने विवाह झाला. काही काळानंतर पटीने निधन झाले, यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. अश्रू अनावर होते परिस्थिती बिघडत होती. मात्र स्वाती यांनी हार नाही मानली आणि व्यवसाय सुरू करून लाखोंची उलाढाल करणाऱ्या कंपनीच्या मालकीन झाल्या.

स्वाती या मूळच्या बार्शीतल्या आहे. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. त्यांनतर महाविद्यालयाचे शिक्षण घेण्यास कुटुंबियांनी विरोध केला आणि २००६ साली लग्न लावून दिले.

मात्र २०१० साली स्वाती यांच्या पतीचे निधन झाले. तेव्हा त्यांचा मुलगा दोन वर्षांचा आणि मुलगी साडेतीन महिन्यांची होती. पतीच्या निधनाने स्वाती यांना काहीच सुचत नव्हते. यानंतर बहिणीने धीर दिला आणि बचत गट सुरू करण्यास सांगितले.

कुटुंबाने बचत गट सुरू करण्यास विरोध केला, तसेच पुढे बचत गट सुरू करायचा असेल तर कुटुंबापासून अलिप्त राहण्यास स्वातीला सांगितले. यानंतर त्यांनी कुटुंबापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला.

दोन हजार उसने घेऊन स्वाती यांनी आपल्या उद्योगाची सुरुवात केली होती. स्वातींनी यावेळी सांगितले की, एक वेळा माझ्या मुलाचा पाच रुपयांहून अपमान झाला होता.

माझ्या मुलाला खाऊसाठी चुलत्याने पाच रुपये दिले होते. ते पैसे दोनदा चुलत्याने मागितले. ते खूप अपमानास्पद होते. तेव्हापासूनच ठरवले कोणाकडे पैसे मागायचे नाही. तसेच आपल्या मुलांनाही चांगले शिक्षण द्यायचे.

एकदा सोलापुरात कृषी प्रदर्शन होते, त्यावेळी एका मॅडमकडून २००० रुपये घेऊन चहाची विक्री केली. त्यातून ७ हजार रुपये नफा मिळवला आणि इथूनच त्यांनी आयुष्यातली पहिली कमाई केली.

मुंबईत बचत गटाचे प्रदर्शन होते. तेव्हा स्वाती यांना मुंबईतील महालक्ष्मी येथे बचत गटातून पाठवण्यात आले होते. बार्शीमधून सहा बचत गट येणार होते. तेव्हा स्वाती त्यांच्या मार्गदर्शक म्हणून येणार होत्या.

त्यावेळी स्वाती यांनी मुंबईला येऊ शकत नाहीत अशा महिलांकडून वस्तू विकत घेतल्या. पण त्यांनी महिलांना आपल्याकडे आत्ता तुम्हाला देण्यासाठी पैसे नाही, मुंबईला माल विकून परत येईन तेव्हा पैसे देईन, विश्वास असेल तर द्या असे सांगितले होते.

स्वाती यांनी ६० हजाराचा माल खरेदी केला होता. मुंबईत त्यांनी तोच माल १ लाख २० हजार रुपयांना विकला. स्वाती यांना आपले स्वतःचे असे काही तरी उभारायचे होते.

तसेच त्यांना त्यावेळी मार्केटिंग बद्दलही बरीच गोष्टी माहीत झाल्या होत्या. तसेच लोकांची आवड लक्षात घेऊन काही केले तर व्यवसाय कधीच तोट्यात जाणार नाही, हे ही त्या जाणून होत्या. यामुळे त्यांनी आपल्या मॅडमची मदत घेऊन सोबत दोन महिलांना घेऊन उडीद आणि शाबू पापडांचा व्यवसाय सुरू केला.

त्यानंतर त्यांच्यासमोर आणखी एक संधी चालून आली. स्वाती यांना केरळला जाण्याची संधी मिळाली. तिथे १० राज्यांचे स्टॉल लागणार होते आणि त्यात महाराष्ट्रही होता. यासाठी बार्शी तालुक्यातून फक्त पाच महिला जाणार होत्या.

त्यात स्वाती यांचे नाव होते, सोबतच गटाचे नेतृत्त्वही त्यांच्याकडे सोपवण्यात आले होते. यावेळी स्वाती यांनी तिने पुरणपोळीचा स्टॉल लावला होता, मात्र तिथे कोणीही पुरणपोळीला पसंती दाखवली नाही.

स्वातीने यानंतर आजूबाजूच्या स्टॉल बघितले असता. तिथे लोकांची पसंती नॉनव्हेजला होती. तेव्हा स्वाती यांनी कोल्हापुरी रस्सा आणि मटण सुरू करण्याचे ठरवले.

सुरुवातीला दोन दिवस व्यवसाय न झालेल्या स्वाती यांनी पुढील आठ दिवसात जवळपास १ लाख ६० हजार रुपये कमावले. केरळहून परतल्यानंतर त्यांना आपण मार्केटिंग चांगली करू शकतो हे लक्षात आले.

स्वाती आणि त्यांची मैत्रीण रोहिणी यांनी स्वदेशी मार्केटिंग कंपनी सुरु केली. यामध्ये त्या फक्त बचत गटातील महिलांच्या वस्तू खरेदी करतात. हे पदार्थ, वस्तू बार्शी, सोलापूर, मुंबई, पुणे अशा ठिकाणी पाठवले जातात.

स्वाती यांच्या मार्फत घरी बसून अनेक महिला २५ ते ३० हजार रुपये कमवत आहे. तसेच स्वाती या महिन्याला ५० हजारहून अधिक पैसे मिळवत आहे. त्यांच्या कंपनीची उलाढाल वर्षाला १५ लाखांहून अधिक होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.