बापरे! मासे खाताय तर वेळीच व्हा सावध, तुमच्या पोटात जातय प्लास्टिक; वाचा…

मुंबई | अनेकांना मासे खुप आवडतात. घरी असो वा बाहेर मच्छी थाळी अनेकांची फेवरेट बनली आहे. परंतु मासे खाणाऱ्यांना धक्का देणारी माहिती समोर आली आहे. कारण मासे तुमच्या पोटात प्लास्टिक घालतात असा खुलासा एका अहवालात झाला आहे.

तुमच्या ताटातील मासे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत असे सांगितल्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही. परंतु हे खरं आहे. कारण माशांमध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण सापडले आहेत.

नॅशनल सेंटर फॉर कोस्टल रिसर्चच्या अहवालात याबाबतच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले आहे. यानुसार चेन्नईमधील मरिना बीचवरच्या माशांमध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण मिळाले आहेत. या किनाऱ्यावरील तब्बल ८० टक्के माशांमध्ये अशाच स्वरुपाचे प्लास्टिकचे कण मिळाले आहेत.

माशांच्या शरीरात कण, तुकडे किंवा धाग्यांच्या रुपात प्लास्टिक सापडते. विशेष म्हणजे खाण्यासाठी मागणी असणाऱ्या बांगडा, बोम्बिल, चेम्बाली, आरन्ना, बारकुडा, चोर बोंबिल, मोरी झिंगा, या माशांचा यामध्ये समावेश आहे.

मासे लाल रंगाच्या घटकांना त्यांच खाद्य समजातात त्यामधूनच त्यांच्या पोटात प्लास्टिक जाते. मोठ्या माशांच्या पोटातून हे प्लास्टिक काढणे शक्य असते. मात्र लहान माशांच्या पोटातून हे निघेल असं नाही.

माशांच्या पोटातील हे प्लास्टिक जास्त प्रमाणात आपल्या पोटात गेल्यास कॅन्सर, अल्सर, आतड्याचे आजार होऊ शकतात. त्यामुळे तुमची कुटुंबाची काळजी घ्या मासे स्वच्छ धुवून घ्या. मासे चांगले आणि स्वच्छ आहेत याची खात्री करा आणि नंतर तुमच्या आवडत्या मच्छी थाळीवर ताव मारा.

महत्वाच्या बातम्या-
नाश्त्याला चहा चपाती खाण्याची चूक करताय तर आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम
आहारात मोड आलेल्या मेथीचे सेवन करा, मिळेल ‘या’ मोठ्या आजारांपासून सुटका
ओवा खाण्याचे आणि आहारात वापरण्याचे आहेत ‘हे’ अप्रतिम फायदे; जाणून घ्या…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.