माशाचा काटा घशात अडकल्यास घाबरू नका; ‘हा’ उपाय करा व काही मिनिटांतच मिळवा आराम

मुंबई | आपल्याकडे मांसाहारींसाठी मासे हे अगदी प्रिय आहे. याचबरोबर भारतामध्ये सर्वत्रच मांसाहारी पदार्थ हे अतिशय चवीने खाल्ले जातात. मांसाहारी पदार्थ खाणाऱ्यांची संख्या भारतात खूप मोठ्या प्रमाणात आहे. याचबरोबर मासे हे आरोग्यासाठी देखील फायद्याचे आहेत.

तसेच चिकन मटण सोबतच माशांचा आस्वाद घेणं हे केवळ जीभेचे चोचले पुरवण्यासाठी नव्हे तर आरोग्यदायी फायद्यांसाठीही अतिशय उपयुक्त ठरतात. मात्र तुम्ही मासे खाणार असाल तर सावधान. अनेकदा मासे खाताना घशात माशाचे अनेक वेळा काटे अडकतात.

मासळी खाताना जर आपल्या घशामध्ये काटे रुतले असतील तर याचा फार मोठा त्रास आपल्याला होतो. मात्र घशात अडकलेले हे काटे नेमके काढायचे कसे? याबाबत आज जाणून घेणार आहोत. घरगुती उपायांनी आपण हे अडकलेले काटे काढू शकतो.

जोरदार खोका –
माशाचे सेवन करताना तुमच्या घशात जर काटा अडकला तर प्रथम जोरात खोकायला सुरूवात करा. जोऱ्यात खोकल्यामुळे माशांच्या काट्यांना गळ्या खाली जाण्यापासून रोखू शकता.

कोमट पाण्यात ब्रेड मिसळा –
कोमट पाणी आणि ब्रेडच्या मदतीने देखील घशात अडकलेले काटे काढण्यास मदत होईल. यासाठी ब्रेड घ्या आणि कोमट पाण्यात किंवा दुधात मिसळा. ब्रेड वितळल्यावर हे मिश्रण प्या. पाण्याचा मऊपणा घशात अडकलेले काटे काढून पोटात घेऊन जातात.

केळीचे सेवन –
याचबरोबर आणखी एक सोपा उपाय म्हणजे केळीचे सेवन करणे. मासोळी खाताना घश्यात काटे अडकले असल्यास तातडीने केळीचे सेवन करावे. यामुळे आपले काटे निघून जाण्यास मदत होते. अशाप्रकारे तुम्ही घशात अडकलेले माशाचे काटे घरगुती उपायांनी काढू शकता.

 

महत्त्वाच्या बातम्या 

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन अमित शाहांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

सुर्यकुमार यादवला भारतीय संघात स्थान का नाही? रवी शास्त्री म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.