बापाची प्रत्येक गोष्ट ऐकणाऱ्या सनी देओलने तिथे मात्र बापाचा सल्ला धुडकवला; पण शेवटी..

बॉलीवूडमध्ये अनेक प्रेम कहाण्या प्रसिद्ध आहेत. पण काही प्रेम कहाण्या जास्त काळ टिकू शकल्या नाहीत. काही कारणांमुळे या कलाकारांचे ब्रेकअप झाले. परंतु ब्रेकअपनंतरही त्यांचे प्रेम कायम होते. आजही ते एकमेकांवर प्रेम करतात.

अशीच एक जोडी आहे अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री डिंपल कपाडीयाची. ८० च्या दशकात या दोघांची लव्ह स्टोरी खुप जास्त प्रसिध्द होती. कुटुंबाच्या दबावामूळे या दोघांचे ब्रेकअप झाले. पण तरीही या दोघांचे प्रेम मात्र कमी झाले नाही.

ही गोष्ट आहे ८० च्या दशकाच्या सुरुवातीची. सनी देओलने ‘बेताब’ चित्रपटापासून बॉलीवूड डेब्यु केला होता. या चित्रपटात अमृता सिंग त्याच्यासोबत मुख्य भुमिकेत होती. चित्रपटाच्या शुटिंग वेळी या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू होत्या.

ज्यावेळी अमृताला सनजले की, सनी देओलचे लग्न झालेले आहे. त्यावेळी या दोघांचे ब्रेकअप झाले. अमृतानंतर सनी देओलच्या आयुष्यात डिंपल कपाडियाची एन्ट्री झाली. हे दोघे अकरा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.

‘मंजिल मंजिल’ चित्रपटाच्या सेटवर या दोघांची लव्ह स्टोरी सुरू झाली होती. त्यानंतर अनेक वर्षे हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. अनेक वेळा या दोघांना एकत्र पाहिले जायचे. असेही बोलले जाते की, हे दोघे एकत्र राहत होते.

कारण या कालावधीमध्ये डिंपल कपाडिया राजेश खन्नापासून वेगळी झाली. या दोघांचा घटस्फोट झाला नव्हता. पण हे दोघे एकत्र राहत नव्हते. सनी देओलने त्याच्या बायकोला सोडले होते आणि डिंपलसोबत राहत होता.

डिंपलची मुलगी ट्विंकलने सनी देओलला छोटे पापा बोलायला सुरुवात केली होती. या गोष्टीबद्दल जेव्हा सनी देओलच्या घरी समजले तेव्हा मात्र खुप मोठी अडचण निर्माण झाली. कारण सनीचे प्रेम प्रकरण त्याच्या घरी मान्य नव्हते.

धर्मेंद्रला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ते खुप चिडले. कारण सनी देओल आणि डिंपल दोघेही विवाहित होते. त्या दोघांवर कुटुंबाची जबाबदारी होती. म्हणून धर्मेंद्र यांनी सनी देओलला हे नातं संपवायला सांगितले.

सनी देओलला ही गोष्ट मान्य नव्हती. त्याने डिंपलला सोडायला नकार दिला. या दोघांच्या प्रेमामुळे या दोघांचे नातं अकरा वर्ष टिकून राहिले. पण वेळेसोबत या दोघांसाठी अडचणी वाढत होत्या.

धर्मेंद्र यांनी सनी देओल सांगितले की, तु डिंपल किंवा तुझे कुटुंब या दोघांपैकी एकाची निवड कर. सनी देओलने या प्रश्नाचे काहीही उत्तर दिले नाही. त्यानंतर धर्मेंद्र यांनी डिंपलची भेट घेतली आणि सगळी परिस्थिती समजवून सांगितली.

डिंपलला सगळ्या गोष्टी समजल्या आणि त्यांनी हे नातं तोडण्याचा निर्णय घेतला. डिंपलने सनीला समजून सांगितले की, त्या दोघांच्या नात्याचा त्यांच्या कुटुंबावरही परिणाम होत आहे. म्हणून आपण हे नातं इथेच संपवू.

डिंपलसाठी सनीने पहिल्यांदा त्याच्या वडिलांना एखाद्या गोष्टीसाठी नकार दिला होता. त्याने त्याच्या कुटुंबाला सोडले होते. पण शेवटी डिंपलच्या सांगण्यावरून सनी परत त्याच्या कुटुंबाकडे गेला आणि त्याने डिंपलसोबत ब्रेकअप केले.

ब्रेकअपनंतरही या दोघांचे प्रेम कमी झाले नाही. अनेकदा या दोघांना एकत्र पाहिले जाते. २००९ मध्ये ज्यावेळी डिंपल कपाडियाची बहीण सिंपल कपाडियाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी सनी देओल डिंपलसोबत तिथे उपस्थित होते.

एवढेच नाही तर काही वर्षांपूर्वी डिंपल आणि सनी देओलचा एक व्हिडिओ खुप जास्त व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये हे दोघे एकमेकांचा हात पकडून बसले होते आणि गप्पा मारत होते. हा व्हिडिओ बघून असे वाटते की, कितीही वेळ गेला तरी या दोघांचे प्रेम मात्र कमी होणार नाही.

हे ही वाचा –

हेमामालिनीने एक चुगलीमुळे धर्मेंद्रने गोविंदाच्या कानाखाली वाजवली होती; जाणून घ्या पुर्ण किस्सा..

अभिनेता धर्मेंद्रला हिंदू धर्म सोडून मुसलमान व्हावे लागले; यामागे आहे ‘हे’ धक्कादायक कारण

संजय दत्तला ‘त्या’ अवस्थेत बघून श्रीदेवीने त्याला धक्के मारून सेटवरुन हाकलून दिले होते

टिव्हीवरची छोटी काॅमेडीयन गंगुबाई आठवतीय? आता इतकी सुंदर दिसतेय की विश्वास बसनार नाही

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.