वर्षाच्या शेवटच्या दिवशी सूर्य मावळतो तेव्हा त्या सोबतच ते वर्षदेखील मावळत असते. हा शेवटचा दिवस म्हणजेच ३१ डिसेंबर. त्या दिवसाला सूर्यास्तचा क्षण अनेक लोकं टिपून ठेवत असतात. सा धा र ण संध्याकाळी स हा च्या आस पास सूर्यास्त होत असतो. परंतु भारतात एक गाव असेही आहे जिथे दुपारी सूर्यास्त होतो. या गावात सकाळी लाच सूर्य उगवतो आणि दुपारीच चार वाजता सूर्य मावळतो.
भारतात सर्वात अगोदर सूर्योदय होणारे राज्य म्हणजेच अरुणाचल प्रदेश आणि सूर्याची पहिली किरण ज्या ठिकाणी पडते ते गावसुद्धा अरुणाचल प्रदेशातच आहे. त्या गावाचे नाव डोंग (Dong Valley) आहे. भारत-चीन-म्यानमार या ट्राय जंक्शनवर हे गाव वसलेले आहे. हे टुमदार असे गाव भारत सीमेवरील पहीले-वहीले गाव आहे
भारतात सगळ्यात आधी सूर्यकिरण पडणारे गाव म्हणून डोंग हे गाव प्रकाश झोतात आले आहे. देश विदेशातील पर्यटक सूर्योदय बघण्यासाठी येथे येत असतात. १९९९ साली हे गाव पर्यटकांच्या नकाशावर आले आहे. जेव्हा सगळे साखर झोपेत असतात तेव्हाच डोंग या गावात डोंगरांआडुन सूर्य डोकावत असतो.
साधारण सकाळी सहाच्या दरम्यान भारतातील बहूतेक ठिकाणी सूर्योदय होतो. परंतु डोंग येथे पहाटे तीन च्या सुमारास सूर्योदय होतो आणि म्हणूनच दुपारी चार वाजता सूर्यास्त होतो. पहाटे चार वाजताच येथील लोकांचा दिवसाला सुरवात होते. येथे १२ तासांचा दिवस असतो. हे गाव समुद्रसपाटी पासून 1240 मीटर उंचीवर असून सीत आणि लोहीत या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.
या गावाबाबत अजुन एक अनोखी गोष्ट आहे. ती म्हणजे, या गावाची लोक संख्या केवळ ३५ आहे. डोंगर पायथ्याशी वसलेल्या या गावात शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. डोंग येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी शेजारी असलेल्या वालोंग गावात राहण्याची सुविधा पाटबंधारे विभागाने दिली आहे. वालोंग हे तेच गाव आहे जेथे भारत-चीन १९६२ चे युद्ध झाले होते. वालोंगपासुन सुमारे ८ किमी चा ट्रेक करुन सूर्योदय बघण्यासाठी जाता येते