एका अनाथ मुलीने पहिल्याच प्रयत्नात पीएसआय पदाला गवसणी घातली आहे. या मुलीचे नाव सुंदरी एस बी असं आहे. ही तरुणी लोणावळ्यातील रहिवासी आहे. सुंदरी एस बी ही महाराष्ट्र राज्याच्या अनाथ मुलांच्या कोट्यातून पोलीस उपनिरीक्षक बनणारी पहिलीच महिला आहे. यामुळे सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.(first orphan women psi in maharastra)
वयाच्या तिसऱ्या वर्षी आई- वडिलांचं छत्र हरवलेल्या सुंदरीने परिस्थितीशी संघर्ष करत हे यश मिळवलं आहे. सुंदरी एस बी वयाच्या तिसऱ्या वर्षी मळवली येथील बालग्राम या संस्थेत दाखल झाल्या होत्या. बालग्राम या संस्थेत राहून त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं आहे. या संस्थेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी लोणावळ्याजवळील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला.
सुंदरी एस बी यांनी कॉम्पुटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलं आहे. आर्थिक गरजा भागवण्यासाठी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना त्या लॅब सहाय्यक म्हणून देखील नोकरी करत होत्या. कॉम्पुटर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पीएसआय पदासाठी परीक्षा दिली. महाराष्ट्र राज्याच्या अनाथ मुलांच्या कोट्यातून त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड करण्यात आली आहे.
सुंदरी एस बी ही महाराष्ट्र राज्याच्या अनाथ मुलांच्या कोट्यातून पीएसआय बनणारी पहिलीच कन्या आहे. सोशल मीडियावर तिच्या या यशाचं कौतुक केलं जातं आहे. सुंदरी एस बीने तिच्या या यशाचं श्रेय ‘सनाथ वेल्फेअर फाऊंडेशन’ या संस्थेला दिलं आहे. ‘सनाथ वेल्फेअर फाऊंडेशन’ हे अनाथ मुलांना मदत करणारी एक संस्था आहे.
या संस्थेने मदत केल्यामुळे मला पीएसआय पदाला गवसणी घालता आली, असे सुंदरी एस बीने सांगितले आहे. आता सुंदरी इतरही परीक्षांचा अभ्यास करत आहे. सुंदरीला आता महिला आणि बालविकास विभागात अधिकारी व्हायचं आहे. यापुढे अभ्यास सुरूच ठेवणार असल्याचं तिने सांगितलं आहे. अभ्यासात सातत्य ठेवल्यामुळे आपल्याला हे यश मिळालं आहे, असे सुंदरी एस बीने सांगितले.
काही दिवसांपूर्वीच पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल लागला होता. या परीक्षेमध्ये नाशिकच्या एका कीर्तनकार मुलीने बाजी मारली आहे. या मुलीचे जिल्ह्यातून कौतुक होत आहे. या मुलीला कीर्तनाची फार आवड आहे. तिने कीर्तनाची आवड जपत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा अभ्यास केला आणि यश मिळवलं आहे.
महत्वाच्या बातम्या :-
मुंबई काबीज करण्यासाठी भाजपचा मोठा डाव; उत्तरप्रदेशातील मंत्री मुंबईत घेणार मेळावे
मतदारसंघात एकही मटनाचं दुकान दिसलं नाही पाहिजे’; भाजप आमदाराचा अधिकाऱ्यांना इशारा
गुटखा तोंडात टाकला अन् तरूणासोबत होत्याचं नव्हतं झालं, औरंगाबादेतील घटनेनं गुटखा खाणाऱ्यांना धास्ती