..त्यावेळी सचिन जेव्हापण मान डोलवायचा भजी त्याच्यासमोर येऊन उभा राहायचा, वाचा भन्नाट किस्सा

चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम सगळ्यांना माहिती आहे. अनेक लोक या कार्यक्रमाचे चाहते आहेत. अनेक मोठे कलाकार, सेलिब्रिटी, खेळाडू, राजकारणी या कार्यक्रमात येत असतात. एकदा क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडुलकर या कार्यक्रमात आला होता.

तेव्हा डॉ. निलेश साबळेने सचिनला क्रिकेटमधील काही भन्नाट किस्से विचारले. निलेश साबळे म्हणाला की हरभजन बरोबरचा एक किस्सा आहे जेव्हा तुम्ही त्याला भेटला होतात. तेव्हा सचिन हरभजनला सिंगला भेटला होता तेव्हाचा एक किस्सा सचिनने सांगितला.

जेव्हा हरभजन सचिनला भेटला तेव्हा १९९४ चा काळ होता. तेव्हा हरभजन हा युवा खेळाडू होता. त्याचे वय जेमतेम १४ ते १५ वर्षे होते. एकदा नेट प्रॅक्टीस करताना सचिनला हरभजन सिंग गोलंदाजी करत होता. हरभजन संघांतील सगळ्या फलंदाजांना गोलंदाजी करत असे. ज्याने त्याचा सराव होत होता.

तेव्हा सचिनची आणि त्याची भेट झाली होती. तेव्हा मोहालीमध्ये वेस्ट इंडिजबरोबर भारताचा सामना होता. तेव्हा नेट प्रॅक्टिसच्या दरम्यान दोनतीवेळा हरभजन सिंग सचिनच्या समोर येऊन उभा राहिला. सचिनला काही कळत नव्हते हा असा का करतोय.

सचिनला एक सवय होती की बॅटींग करायच्या आधी तो मान खाली वरती करून हेल्मेट ऍडजस्ट करायचा. सचिनला सगळेजण टीममध्ये पाजी म्हणायचे. पाजी म्हणजे मोठा भाऊ. जेव्हा पण सचिन हेल्मेट ऍडजस्ट करण्यासाठी मान हालवायचा तेव्हा हरभजन त्याच्या जवळ यायचा आणि म्हणायचा ‘जी पाजी’.

तेव्हा सचिन त्याला म्हणाला काय झालं? हरभजन म्हणाला काही नाही. तो परत मागे गेला. दोन तीन चेंडू टाकले की हरभजन परत सचिनच्या पुढे उभा राहिला. त्याला हे कळतच नव्हते की सचिन जेव्हा खेळायचा तेव्हा त्याचे हेलमेट वरती जायचे ते ऍडजस्ट करण्यासाठी सचिन मान डोलवायचा.

पण हरभजनला वाटायचे की सचिन आपल्याला बोलावत आहे. जेव्हा पण सचिन मान हालवायचा तेव्हा भजी त्याच्यासमोर येऊन उभा राहायचा. तेव्हा सचिन म्हणाला काय करतोय परत जा. काही दिवसांनी हरभजनला सवय झाली आणि सगळं काही कळू लागले.

जेव्हा पण सचिन मान डोलवायचा तेव्हा भजीला समजायचे तो हेल्मेट नीट करत आहे. पण सचिन कधीकधी मुद्दाम मान डोलवायचा जेणेकरून भजी काय करतोय हे त्याला समजेल. पण तो सचिनला म्हणायचा मला आता माहित आहे काय चालले आहे.

तेव्हा दोघेही मोठमोठ्याने हसू लागले. त्यावेळी हरभजन सचिनला पहिल्यांदा भेटला होता. त्यानंतर दोघांची घट्ट मैत्री झाली होती. असे अनेक भन्नाट किस्से सचिनने यावेळी सांगितले. सचिन असेही म्हणाला की आताच्या भारतीय संघातही अनेक खोडकर खेळाडू भरले आहेत.

आमच्यावेळी आम्ही खुप मस्ती करायचो आणि ड्रेसिंग रूममधील अनेक किस्से यावेळी सचिनने सांगितले. तुम्हाला हा किस्सा कसा वाटला आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
जेव्हा सचिनने आणि सेहवागने ड्रेसिंगरूममध्ये केली होती गांगुलीची फजिती, किस्सा वाचून पोट धरून हसाल
न्यूझीलंडच्या ख्रिस केर्न्सला सचिन – द्रविडने बनवले होते उल्लू; स्वत: सचिननेच सांगीतला भन्नाट किस्सा..
“तेव्हा सलमान म्हणाला, तुला कुठलीही मदत लागली तर मला सांग मग डॉक्टर असो वा पैसे मी देईल”
“तेव्हा सलमान म्हणाला, तुला कुठलीही मदत लागली तर मला सांग मग डॉक्टर असो वा पैसे मी देईल”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.