औरंगाबादमधून आर्मीमध्ये भरती होणारी पहिली महिली ठरली शिल्पा, गावकऱ्यांनी वाजत गाजत काढली मिरवणूक

औरंगाबाद अजिंठा डोंगर रांगेत वसलेल्या अतिशय दुर्गम भागातील डकला या गावातील तरूणी प्रचंड इच्छाशक्ती आणि कष्ट करून भारतीय सैन्यदलात भरती झाली आहे. ती आसाम रायफल्स या शाखेत रूजू होणार आहे. मागील वर्षी पुण्यात सैन्यदलाची भरती झाली होती.

त्यामध्ये तिने परिक्षा दिली होती आणि ती पास झाली. तिची सैन्यदलात निवड झाली. सध्या ती ईशान्य भारतातील नागालॅंड येथे भरतीपुर्व ट्रेनिंग घेत आहे. ती सिल्लोड तालुक्यातील डकला येथील रहिवासी आहे. शिल्पा राजू फरकाडे असे त्या तरूणीचे नाव आहे. तिचे प्राथमिक शिक्षण हळदा-डकला येथील प्राथमिक शाळेत झाले होते.

त्यानंतर प्राथमिक शिक्षण तिने पैठणमध्ये घेतले होते. उच्च माध्यमिक शिक्षण तिने सिल्लोडमधून घेतले आहे. तिच्या शिक्षणाची जबाबदारी तिच्या मामांनी म्हणजे प्रभू शामराव साखळे यांनी घेतली होती. शिल्पाची घरची परिस्थिती खुप बेताची होती त्यामुळे मामाने तिला खुप मदत केली.

त्यांनीच तिला सैन्यदलात भरती होण्याची प्रेरणा दिली होती. प्रशिक्षण घेतल्यानंतर पहिल्यांदा तिने मामाचा आणि आईचा आशिर्वाद घेतला. २०१८ मध्ये तिने सैन्य भरतीची जाहिरात पाहिली होती. स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे सैन्य भरती होणार होती. तिने तो अर्ज भरला आणि आसाम रायफल्सला प्रथम प्राधान्य दिले होते.

सहा महिन्यांपुर्वीच या परिक्षेचा निकाल लागला आणि तिची आसाम रायफल्समध्ये निवड झाली. त्यानंतर ती नागालँडला गेली जिथे तिला बोलावण्यात आलं होतं. प्रशिक्षण संपल्यानंतर ती गावाकडे परतली. गावातील नागरीकांनी शिल्पाचे जंगी स्वागत केले आणि तिची वाजत गाजत मिरवणूक काढली.

२८ नोव्हेंबरला ती पुन्हा नागालँडला रवाना होणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून सैन्यात भरती होणारी शिल्पा ही पहिली तरूणी आहे. तिचे शिक्षक के. एन. सपकाळ म्हणाले की, तिची मेहनत आणि ध्येय साध्य करण्याच्या इच्छाशक्तीवरून तिने हे यश मिळवले आहे.

महत्वाच्या बातम्या
‘I love you’ म्हणत विराट कोहलीने एबी डिव्हिलियर्ससाठी केली भावनिक पोस्ट, चाहतेही झाले भाऊक
अक्षय कुमारच्या ‘सुर्यवंशी’ने बंटी और बबली २ ला टाकले मागे, कमावले तब्बल ‘इतके’ कोटी
वेटरचं काम सोडून ‘हा’ अभिनेता बनला होता बॉलिवूडचा स्टंट मास्टर, आज त्याचाच मुलगा देतो कलाकारांना काम
रोहितने एकाच सामन्यात तोडला दोन महान खेळाडूंचा रेकॉर्ड; आफ्रिदीलाही टाकले मागे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.