करीनाच्या सुपर क्यूट बाळाची पहिली झलक, पहा व्हायरल फोटो

मुंबई | अभिनेत्री करीना कपूर २१ फेब्रुवारीला दुसऱ्यांदा आई झाले. तिच्या लहान बाळाची झलक पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. अशात करीना कपूरने महिला दिनानिमित्त एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये चाहत्यांना बाळाचा खास फोटो पाहायला मिळला आहे.

करीना कपूरने महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी शेअर केलेला फोटो ब्लॅक ऍण्ड व्हाईट आहे. यामध्ये करीनाच्या खांद्यावर बाळ निवांत झोपले असल्याचे दिसते. फोटोत बाळाचा चेहरा दिसत नाही.  फोटो शेअर करताना करीनाने कॅप्शन दिले आहे. यामध्ये ती लिहिते, “असं काहीही नाही जे महिलांना अशक्य आहे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा”

या फोटोमुळे चाहत्यांना करीना सैफच्या मुलाची पहिली झलक मिळाली आहे. या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. करीनाचा मोठा मुलगा तैमूर प्रमाणेच या लहान बाळाला चाहत्यांचे प्रेम मिळताना दिसून येत आहे.

दरम्यान, या लहान बाळाचे नाव काय ठेवले जाणार याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. करीना आणि सैफ त्यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव काय ठेवणार? हे जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

२०१६ मध्ये पहिल्या बाळाचे नाव तैमूर ठेवल्याचे जाहिर करताच करिना व सैफ मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले होते. तैमूर या नावावरून वादही निर्माण झाला होता. या कारणामुळेच सैफ आणि करीना यावेळी बाळाचे नाव जाहीर करताना सतर्कता बाळगणार असल्याचे समजते आहे.

महत्वाच्या बातम्या-
…म्हणून सैफ अली खानला लग्नाआधी करीनाने दिला होता दोनदा नकार 
छोटे नवाब तैमुरवर महिन्याला तब्बल ‘एवढे’ रुपये खर्च करते करीना कपूर
करीनाच्या बाळाचा जन्म होताच ‘औरंगजेब’, ‘बाबर’ ट्रेंडमध्ये; जाणून घ्या कारणं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.