आता भारतातील रस्त्यांवर ग्रीन हायड्रोजन कार पाहायला मिळणार आहेत. देशातील पहिली ग्रीन हायड्रोजन कार लाँच करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांच्या हस्ते बुधवारी त्याचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी नितीन गडकरी यांच्यासोबत केंद्रीय मंत्री हरदीप सिंह, महेंद्रनाथ पुरी आणि आरके सिंह देखील उपस्थित होते.(first hydrogen car launched by nitin gadkari)
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रीन हायड्रोजनवर चालणारी ही कार सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आली आहे. ही कार यशस्वी झाल्यास आगामी काळात अशी वाहने देशभरात मोठया प्रमाणात विकली जातील. इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी या संस्थेच्या सहकार्याने टोयोटा कंपनीने ही कार डिझाइन केली आहे.
ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेलवर चालणारी ही देशातील पहिली कार आहे. विशेष म्हणजे याचा वेग इलेक्ट्रिक वाहनापेक्षा जास्त असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ही कार लक्झरी वाहन श्रेणीमध्ये असणार आहे. त्यामुळे या कारची किंमत देखील जास्त असणार आहे. त्यामुळे सामान्य लोकांना ही कार परवडण्याची शक्यता फार कमी आहे.
ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या या कारला २ किमीचे अंतर कापण्यासाठी एक रुपयांपेक्षा कमी खर्च येणार आहे. सध्या पेट्रोलवर चालणाऱ्या कारला प्रति किलोमीटर ५ ते ७ रुपये खर्च येतो. तसेच सीएनजीवर चालणाऱ्या कारला प्रति किलोमीटर ३ ते ४ रुपयांपर्यंतचा खर्च येतो. त्यामुळे ग्रीन हायड्रोजन कारमुळे ग्राहकांची मोठी बचत होणार आहे.
या ग्रीन हायड्रोजन कारमध्ये फक्त पाच मिनिटांत इंधन भरता येणार आहे. या कारची इंधन टाकी ६.२ किलो क्षमतेची आहे. त्यामुळे एकदा टाकी फुल भरल्यास ही कार ६५० किमीचा प्रवास करू शकणार आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात एक किलो हायड्रोजन इंधनाची किंमत एक डॉलर म्हणजेच ७० रुपये आहे.
एक किलो हायड्रोजन इंधनामध्ये ही कार १२० किमीचे अंतर कापते. जसजसे तंत्रज्ञान प्रगत होत जाईल तसतशी ही वाहने स्वस्त होतील. या वाहनांचा वापर वाढल्यास महागड्या पेट्रोल आणि डिझेलपासून लोकांची सुटका होईल. ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांमुळे प्रदूषणाचा धोका कमी होणार आहे. तसेच पेट्रोल, डिझेलसारख्या इंधनाची कमतरता भासणार नाही.
महत्वाच्या बातम्या :-
महिला पोलिसाचा दुर्गावतार , दहशत पसरवणाऱ्या सराईत गुंडाची रस्त्यावरूनच काढली धिंड
यामी गौतमनेही द काश्मिर फाईल्सचे केले कौतुक, म्हणाली, काश्मिरी पंडिताशी लग्न केल्यामुळे मला..
मला असं वाटतं, सर्वांनी माझ्या पात्राचा तिरस्कार करावा; ‘द काश्मीर फाइल्स’ची अभिनेत्री अशी का म्हणाली?