हेमामालिनीसोबत किसिंग सीन करणार होते फिरोज खान; पण ‘या’ व्यक्तीने केला कडाडून विरोध

इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात देखील काम करत असतात. फिरोज खान देखील असेच कलाकार होते. ते उत्तम अभिनेते तर होतेच. त्यासोबतच ते चांगले निर्माते देखील होते. त्यांनी निर्मिती क्षेत्रात चांगले काम केले आहे.

६०, ७० आणि८० च्या दशकामध्ये फिरोज खानने बॉलीवूडवर राज्य केले होते. इंडस्ट्रीतील सर्वात स्टालिश आणि हँडसम अभिनेते म्हणून त्यांना ओळखले जाते. अनेकांच्या मनावर त्यांनी राज्य केले आहे. फिरोज खानने त्यांच्या करिअरमध्ये अनेक मोठ्या अभिनेत्रींसोबत काम केले होते.

अशीच एक अभिनेत्री म्हणजे हेमा मालिनी. हेमा मालिनी त्यांच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांच्यासोबत रोमान्स करण्याचे स्वप्न तर प्रत्येक कलाकार बघत होता. फिरोज खानला ही संधी मिळाली होती. पण एका व्यक्तीमूळे त्यांचे स्वप्न पुर्ण होऊ शकले नाही.

फिरोज खान आणि हेमा मालिनी पहिल्यांदा ‘धर्मात्मा’ चित्रपटात एकत्र दिसले होते. हेमाने पहिल्यांदा या चित्रपटात धर्मेंद्रला सोडून दुसऱ्या कोणत्या अभिनेत्यासोबत रोमँटिक सीन द्यायला होकार दिला होता. पण ही गोष्ट त्यांच्या आई जया मालिनीला मान्य नव्हती.

त्या काळात हेमा मालिनीचे स्टारडम सर्वाधिक होते. म्हणून त्यांच्यासोबत रोमान्स करायला प्रत्येक अभिनेता तयार होता. हीच गोष्ट त्यांच्या आईला मान्य नव्हती. म्हणून त्यांनी हेमाला फिरोज खानसोबत रोमँटिक सीन द्यायचे नाहीत असे सांगितले.

त्यावेळच्या परिस्थिती अशी होती की, हेमा धर्मेंद्रला यांना सोडून दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्यासोबत रोमँटिक सीन्स देत नव्हत्या. त्यांनी फिरोज खानला या सीनसाठी होकार दिला होता. पण यामुळे हेमाच्या आई जया मालिनी दुखी झाल्या होत्या.

काहीही केलं तरी त्यांना हेमा आणि फिरोज खान यांच्यातला रोमान्स मान्य नव्हता. हेमाने देखील अनेकदा आईला समजवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्या काहीही ऐकायला तयार नव्हत्या. त्यांनी हेमाला बजावून सांगितले होते की, त्या फिरोज खानसोबत रोमँटिक सीन देणार नाहीत.

म्हणून त्या हेमासोबत रोज चित्रपटाच्या सेटवर यायच्या. त्यांना येऊ नका सांगितले तरी त्या ऐकत नव्हत्या. हेमाच्या आईमूळे फिरोज खानला रोमँटिक सीनची शुटींग करता येत नव्हती. त्यात एक किसिंग सीन देखील होता.

किसिंग सीनबद्दल हेमाच्या आईला समजले तेव्हा त्या खुप भडकल्या. शेवटी फिरोज खान स्वतः त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितले की, ते चित्रपटात हेमासोबत कोणताही किसिंग सीन नाही देणार. पण तेव्हाही जया मालिनी ऐकायला तयार नव्हत्या.

चित्रपटाची शुटींग पुर्ण होत नाही तोपर्यंत त्या चित्रपटाच्या सेटवर यायच्या. शेवटी कोणतेही रोमँटिक सीन चित्रित न करता त्यांनी शुटींग पुर्ण केली. जया मालिनीमूळे फिरोज खानला हेमा मालिनीसोबत किसिंग सीन देता आला नाही.

महत्वाच्या बातम्या –

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा विवाह झाला संपन्न; पहा लग्नाचे फोटो
…म्हणून अभिनेत्री आयशा झुल्काने कधीच आई न होण्याचा निर्णय घेतला; कारण वाचून धक्का बसेल
‘लव्ह स्टोरी’ फेम अभिनेत्री विजेता पंडितची झाली आहे खुपच वाईट अवस्था; आर्थिक अडचणींचा करत आहे सामना
शिल्पा शेट्टीला जबरदस्ती किस केल्यामुळे अडचणीत आला होता अभिनेता; वाचा पुर्ण किस्सा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.