थरारक चकमकीत पोलीसांनी चोरासह पकडले ४४० हिरे; किंमत ऐकून घालाल तोंडात बोटे

जगभरात श्रीमंत लोक हिरे परिधान करतात.हिऱ्यांच्या किमती अव्वाच्या सव्वा असतात, त्यामुळे त्यांना वागवणे सामान्य लोकांच्या आवाक्यात नसते. छत्तीसगडमधील पोलिसांनी पण दुचाकीवरून होणाऱ्या हिऱ्यांच्या तपासाचा छडा लावला आहे.

पोलिसांनी दुचाकीवरून होणाऱ्या तस्करांची टोळी पकडली आहे. पोलिसांनी या चोरांकडून ५० लाख रुपये किमतीचे हिरे पकडले असून जप्त केलेल्या हिऱ्यांची संख्या ४४० असल्याचे सांगण्यात आले आहे. हिऱ्यांचे तस्कर स्कुटीवरून हे हिरे छत्तीसगड राज्यातील फिंगेश्वरमार्गे रायपूरला नेत होते.

पोलिसांनी या हिरे तस्करांना वाटेत पकडले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांना धाडसाने पकडले. पोलिसांनी त्यांना पकडल्यावर त्यांच्याकडे थोडेथोडके नव्हे तर तब्बल ४४० हिरे सापडले. एकाच वेळी चोरांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर हिरे सापडण्याची छत्तीसगढ मधील ही पहिलीच वेळ आहे.

गरियाबंद जिल्ह्यातील मैनपुरी परिसरात पायलीखांड नावाची हिऱ्याची खाण आहे.तेथून रोज हिऱ्यांची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. गरियाबंद जिल्हा पोलिसांनी पण आतापर्यंत ७ विविध ठिकाणांवरून ६७२ हिरे जप्त केले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत दीड कोटी किमतीचे ११०० मग हिरे जप्त केले आहेत.

अवैध खाणकाम जेथे होते तेथून कमी किमतीत हिरे खरेदी केले जातात आणि चांगल्या भावात ते शहरात विकत असत. हिऱ्यांची एवढ्या मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्यामुळे यामागे मोठ्या व्यक्तीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी हिरे तस्करांना पकडले असून दोघे जण असल्याचे सांगण्यात आले आहे. आता त्यांच्याकडे मिळालेल्या मोबाईलमधील कॉल्सची चौकशी केली जात आहे. आता हे हिरे खाणतस्कर भागातून तस्कर कोणाकडून घेत होते आणि कोणाला विकत होते याचा तपास पोलीस करत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.