विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याची शेंडी न्हाव्याने कापली, धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल

दिल्ली | उत्तराखंडमधील हलद्वानी येथे एका न्हाव्याला केस कापताना एका विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याची शेंडीच कापली. यानंतर खूप गोंधळ झाला आणि त्या न्हाव्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला तुरुंगात जाण्याची वेळ येणार असल्याचे बोलले जात आहे.

न्हाव्यावर असा आरोप लावण्यात आला आहे की, त्याने जाणूनबुजून धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याची शेंडी कापली आहे. जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा त्या ठिकाणी खूप गोंधळ उडाला.

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे बघत न्हावी तेथून पसार झाला. त्यानंतर हे प्रकरण इतके चिघळले की नाईलाजाने पोलिसांना गुन्हा दाखल करून घ्यावा लागला आहे. विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विशंभर दत्त पलडिया हे हलद्वानी येथील लामचौडी येथील रहिवासी आहेत.

घराजवळच असलेल्या एका हेअर ड्रेसरच्या दुकानात ते केस कापण्यासाठी गेले होते. यादरम्यान केस कापता कापता न्हाव्याने थेट शेंडीवरून कैची फिरवली. यानंतर गोंधळ उडाला आणि काही वेळापूर्वीच पलडिया यांचे भाऊ येथुन केस कापून गेले होते. आणि धक्कादायक म्हणजे त्यांचीही शेंडी न्हाव्याने कापली होती.

त्यामुळे न्हाव्याने जाणूनबुजून आमची शेंडी कापली असा आरोप दोघांनी केला आहे. तणाव वाढल्यानंतर त्या न्हाव्याविरोधात कलम २९५ अ अंतर्गत धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसां एक प्रेस रिलीज केली आहे आणि आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

तुम्हाला हाकलून देण्यात येईल; न्यूझीलंड सरकारचा पाकिस्तान क्रिकेट टीमला इशारा

‘अर्णब पाठोपाठ कंगना प्रकरणात ठाकरे सरकारचं थोबाड फुटलं’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.