‘या’ कारणामुळे आलिया भट्ट आणि महेश भट्ट यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मुंबई | आलिया भट्ट आणि महेश भट्टवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आलिया भट्ट हीच सडक २ हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

याआधीही या चित्रपटावर घराणेशाहीच्या मुद्द्यावरून बहिष्कार टाकण्यात यावा असं लोक बोलत होते. कारण सुशांतची आत्महत्या ही घराणेशाहीमुळे झाली आहे असं सुशांतच्या चाहत्यांचे म्हणणे होते.

पण या चित्रपटामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचे म्हणत आलिया आणि चित्रपटाचे दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१९९१ मध्ये सडक हा चित्रपट प्रदर्शित झाला होता पण सडक २ हा महेश भट्ट प्रदर्शित जुन्या चित्रपटाचा रिमेक आहे. सडक २ हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

कलम २९५ आणि १२० ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून येणाऱ्या ८ जुलैला या प्रकरणाची सुनावणी आहे. या चित्रपटात आलिया भट्ट बरोबर तिची बहीण पूजा भट्ट सुद्धा दिसणार आहे.

आलिया भट्ट बरोबर संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूरसुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या पोस्टरवरून वाद निर्माण झाला आहे.

सडक २ च्या पोस्टरवर मागे हिमालय पर्वताचा फोटो पाहायला मिळत आहे. या फोटोवर सडक २ असं लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

हिंदू धर्मात हिमालय पर्वताला महत्वाचे स्थान आहे. पोस्टरमध्ये हिमायलयाला सडक २ असे नाव दिल्याने हा गुन्हा दाखल केल्याचे बोलले जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.