धक्कादायक! मिथून चक्रवर्ती यांच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल

सध्या बॉलीवूड खुप जास्त वादाच्या भावऱ्यात आहे. अशातच अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षयवर एका अभिनेत्रीने बलात्कार आणि गर्भपात करायला लावल्याचा गुन्हा दाखल केला आहे. महाअक्षयसोबत मिथून यांच्या पत्नी योगिता बालीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये त्या अभिनेत्रीने सांगितले की, ‘२०१५ मध्ये ती आणि महाअक्षय रिलेशनशिपमध्ये होते. महाअक्षयनने तिला घरी बोलवले आणि तिच्या सॉफ्ट ड्रिंकमध्ये नशेचे औषध मिसळून दिले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला’.

या घटनेनंतर कित्येकदा महाअक्षयने लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तिचा मानसिक छळ देखील केला. ज्यावेळी पीडिता गर्भवती राहिली. त्यावेळी त्याने जबरदस्ती गर्भपात करण्यासाठी दबाब टाकला. पीडितेने गर्भपाताला नकार दिल्यानंतर गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला.

पीडितेचे म्हणणे आहे की, तिला माहिती नव्हते की त्या गोळ्या गर्भपाताच्या आहेत. त्यावेळी या सर्व गोष्टींबद्दल तिने महाअक्षयची आई म्हणजेच योगिता बालीला सांगितले होते. परंतु त्यांनी तिची काहीही मदत केली नाही. त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.

पीडिता बॉलीवूड अभिनेत्री आहेत. सोबतच ती मॉडेलिंग देखील करते. या अभिनेत्रीने महाअक्षय आणि योगिता बाली या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

कर्जमाफीच्या फक्त घोषणा, अद्याप पूर्ण कर्जमाफी नाहीच’

नवरात्रौत्सवात सोने खरेदी करताय, त्याच्याआधी जाणून घ्या सोन्याचे नवे दर

सुशांत प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कंगनाला न्यायालयाचा दणका; धार्मिक तेढ पसरवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

तुमचे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे! भाजपच्या शेलारांनी केले चक्क ठाकरेंचे कौतूक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.