कंगनाला न्यायालयाचा दणका; धार्मिक तेढ पसरवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

मुंबई | काही दिवसांपासून आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना राणावत विरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना हा आदेश दिला असून यामुळे कंगना पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कंगनाची बहीण रंगोली हिच्या विरोधातही एफआयआर दाखल करण्यास सांगितली असल्याची माहिती मिळत आहे. कंगना आणि रंगोली ट्विट आणि मुलाखतींच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप आहे.

वाचा काय आहे प्रकरण…
मोहम्मह अश्रफुल्ला सय्यद नावाच्या व्यक्तीने वांद्रे सत्र न्यायालयात तक्रार केली होती. सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून कंगना राणावत बॉलिवूड आणि एका समाजाविरोधात वक्तव्ये केली होती.

तसेच सोशल मीडियावर अनेक पोस्ट करत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार केली होती. याशिवाय ती हिंदू-मुस्लीम समुदायात धार्मिक तेढ वाढवत आहे. कंगना ही अनेकवेळा आक्षेपार्ह ट्विट करत आहे. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होत आहे. तसेच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असे म्हटले आहे.

तसेच कंगनाचे ट्वीट, व्हिडीओ या व्यक्तीने न्य़ायालयात सादर केले होते. याच पार्श्वभुमीवर न्यायालयाने कलम १५६ (३) अंतर्गत एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या

तारक मेहतातील जेठालालचे मानधन ऐकून होश उडतील; मोठमोठ्या सेलिब्रीटींना टाकलय मागे

मुलाचे चित्रपट कमवतात ४०० कोटी परंतु वडील आजही चालवितात बस; जाणून घ्या कारण

भरातलं करीअर सोडून विनोद खन्ना ओशो आश्रमात का गेले होते? अखेर मुलगा अक्षयने केला खुलासा

सचिनची मुलगी सारा तेंडूलकर शुभमन गिलची पत्नी? पहा कसं काय घडलं हे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.