नाद करा पण यांचा कुठं! बुलेट नाही, तर आता ‘महाराजा थाळी’ संपवा आणि जिंका एक तोळं सोनं

उल्हासनगर | कोरोना महामारीचा हॉटेल व्यवसायाला चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. या संकटातून सावरताना हॉटेल व्यवसायिक अनेक भन्नाट कल्पना ग्राहकांसाठी घेऊन येत आहेत. अशीच एक कल्पना उल्हासनगरच्या मिट अँन्ड इट या हॉटेलने ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे.

मिट अँन्ड इट हॉटेल मालकाने एक थाळी खवय्यांसाठी उपलब्ध केली आहे. या थाळीला ‘महाराजा थाळी’ असे नाव देण्यात आले आहे. या थाळीतील सर्व पदार्थ जो कोणी खाऊन फस्त करेल त्याला चक्क एक तोळे सोने दिले जाणार आहे.

आपल्या जीभेचे चोचले पुरवण्यासाठी खवय्यांची कुठेही जाण्याची नेहमीच तयारी असते. अशा लोकांसाठी एक नवं चॅलेंज उल्हासनगरच्या कॅम्प ४ मध्ये लालचक्की भागातील मीट अँन्ड इट हॉटेलकडून देण्यात आले आहे. शुक्रवारपासून शिवजयंतीच्या निमित्ताने महाराजा थाळीची सुरूवात करण्यात आली आहे.

काय असेल महाराजा थाळीत?
चिकन, मटण, अंडी, चिकन व मटन बिर्याणी, पापलेट, सुरमई, बांगडा, बोंबील, चिकन लॉलीपॉप यासोबत रोटी, भाकरी, घावणे, तंदुरी असणार आहे. याशिवाय पापड, सेलकढी, ताक यांचाही समावेश थाळीत असणार आहे.

थाळीत येणारे सर्व पदार्थ ४५ मिनिटात एकट्याने खाऊन दाखवले तर त्याला हॉटेलकडून एक तोळा सोने देण्यात येणार आहे. ही थाळी हवी असेल तर दोन तास आधी ऑर्डर द्यावी लागणार आहे. नवनाथ झोटिंग आणि रेश्मा झोटिंग हे दाम्पत्य हॉटेलचे व्यवस्थापन पाहत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-
थाळी घेतली खाऊन गेला बुलेट घेऊन! ‘बुलेट थाळी’ फस्त करणारा पठ्ठ्या शिवराज हॉटेलला भेटलाच
बुलेट थाळी फस्त करण्याचा विचार करताय, तर वाचा काय खास आहे ‘त्या’ थाळीत
सोलापूरच्या तरुणाची अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अनोखी ट्रॅक्टर सेवा; वाचून तुम्हाला वाटेल अभिमान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.