Share

चॅलेंज! ‘या’ फोटोतील बिबट्या शोधून दाखवा, ९९ टक्के लोकं झालेत फेल

Liberad

ओळखा पाहू, हा फोटो कुठला, हे ठिकाण कुठलं असे कॅप्शन असणारे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका फोटोने सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला आहे. या फोटोने अनेकांना चक्रावून सोडले आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमधील बिबट्या शोधण्यात ९९% लोक फेल झाले आहेत.(find liberd in this viral photo )

या फोटोमधील बिबट्या शोधण्यासाठी लोकांना डोळ्यांवर खूप जोर द्यावा लागतो. जर तुम्ही या फोटोतील बिबट्या शोधला तर तुमची दृष्टी चांगली आहे, असे सिद्ध होईल. तुम्ही तीक्ष्ण नजरेने या बिबट्याला पाहू शकता. या फोटोमध्ये बिबट्या जय ठिकाणी बर्फ संपतो आणि दगड-बर्फाच्या मध्ये एक खाच तयार होते, तिथेच हा बिबट्या लपलेला आहे.

पर्वताच्या एका टोकाशी तो सहजपणे दिसत आहे. छायाचित्रकार सौरभ देसाई यांनी २७ फेब्रुवारी रोजी इंस्टाग्रामवर हे छायाचित्र शेअर केले आहे. हा फोटो शेअर करताना छायाचित्रकार सौरभ देसाई यांनी एक संदेश लिहिला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “हे छायाचित्रे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. मला आनंद आहे की लोक या छायाचित्रात बिबट्या शोधत आहेत.

छायाचित्रकार सौरभ देसाई यांच्या या पोस्टला आतापर्यंत तीन हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. शेकडो सोशल मिडीया युझर्सनी त्यांच्या छायाचित्रणाची प्रशंसा केली आहे. काही युझर्सनी चित्रात हिम बिबट्या शोधण्याच्या अयशस्वी प्रयत्न केला आहे. हिम बिबट्या हा पर्वतीय प्रदेशात वास्तव्यास असतो.

हिमालयाच्या बर्फाळ टेकड्यांवर हिम बिबट्या आढळून येतो. या हिम बिबट्याचा रंग आणि रूप पर्वतीय प्रदेशातील वातावरणाशी मिसळणारा आहे. त्यामुळे बर्फाळ टेकड्यांवर या हिम बिबट्याचा शोध घेता येत नाही. या हिम बिबट्याला ‘पर्वतीय प्रदेशातील भूत’ असे देखील ओळखले जाते. भारतातील हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये हिम बिबट्या आढळून येण्याचे प्रमाण जास्त आहे.

महत्वाच्या बातम्या :-
गुंतवणूकदारांना बसेना विश्वास, ‘या’ शेअरने दिला १ लाख टक्के परतावा, १० हजाराचे झाले १ करोड
बॉलीवूडची बोल्ड ब्युटी मल्लिका शेरावतने शेअर केले सोशल मिडीयाला आग लावणारे फ़ोटो; पाहून थक्क व्हाल
थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणाऱ्या.., रितेश देशमुखने पावनखिंड चित्रपटाचे केले तोंडभरून कौतुक

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now