आयपीएल संपवून सध्या भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. यामध्ये पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात हार्दिकच्या बोलिंगची उणीव भासल्याचे कर्णधार कोहलीने मान्य केले.
आता हार्दिक पांड्याने भारतीय संघाला तसेच कर्णधार विराट कोहलीला मोठा धक्का दिला आहे. संघात दुसरा ऑलराऊंडर शोधा अशा स्पष्ट शब्दात हार्दिक पांड्याने निवड समितीला आणि कर्णधार कोहलीला सांगितले आहे. यामुळे आता सर्वांना एकच धक्का बसला आहे.
काही दिवसांपासून पाठीच्या आजारामुळे हार्दिक बोलिंग करु शकत नाही. आयपीएलच्या हंगामात त्याने मुंबईकडून बॅटिंग केली. सध्या तो त्याच्या बोलिंग अॅक्शनवर तसेच बोलिंग स्पीडवर काम करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात हार्दिकच्या बोलिंगची उणीव देखील भारतीय टीमला भासली.
तो म्हणाला, बोलिंगचा सहाव्या पर्यायासाठी भारतीय संघाने दुसऱ्या ऑलराऊंडरचा शोध घेणे आवश्यक आहे, ऑलराऊंड सर्वांना सोबत घेऊन खेळ करेल, असा विचार केला गेला पाहिजे.
यावेळी त्याने भाऊ क्रुणालचे नाव घेतले. निवड समितीने क्रुणालच्या नावाचा समावेश करायला हरकत नाही. भारतीय संघाकडे दुसरे पर्याय असतील तर त्यांचाही त्यांनी विचार करायला हवा. पण नसतील तर क्रुणालचा पर्याय आहे, असेही तो म्हणाला.
येणाऱ्या आयसीसी टी ट्वेन्टी वर्ल्ड कपची तयारी सुरू असून मोठ्या टूर्नामेंटमध्ये माझे बॅटिंग आणि बोलिंगमध्ये कश्या पद्धतीने चांगले प्रदर्शन होऊ शकते, यावर काम सुरू असल्याचे देखील तो म्हणाला आहे.