अखेर निर्णय आला; अंतिम वर्षाची परीक्षा होणारच !

नवी दिल्ली | अंतिम वर्षाच्या मुलांच्या परीक्षांचा प्रश्न टांगणीला असताना अखेर आज निर्णय झाला. केंद्रीय गृह मंत्रायलायने आज विद्यापीठे आणि महाविद्यालये यांना अंतिम वर्षाची परीक्षा घेण्यास परवानगी दिली.

केंद्र सरकारने उच्च शिक्षण सचिवांना पत्र पाठवले असून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे बंधनकारक आहे असे म्हंटले आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबतच्या नियमावलीला गृह मंत्रालयाने परवानगी दिली आहे. या नियमावलीनुसार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार परीक्षा घेणे बंधनकारक आहे.

अलीकडे विद्यापीठे आणि महाविद्यालयीन सत्र व अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या चर्चा बऱ्याच रंगल्या होत्या. कोरोनामुळे या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत अशी चर्चा होत होती. पण आता या चर्चाना पूर्णविराम लागला आहे.

यामुळे मोठ्या प्रमाणात अफवा पसरत होत्या आणि विष्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होत होते. अखेर गृह मंत्रालयाच्या निर्णयामुळे हा संभ्रम दूर झाला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.