Share

Eknath Shinde : अखेर ठरलं! दसरा मेळावा एकनाथ शिंदेच घेणार, मेळाव्यातून जोरदार शक्तिप्रदर्शनही करणार

Eknath Shinde Uddhav Thackeray

Eknath Shinde : मागील दोन महिन्यात राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथी झाल्या. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेशी बंडखोरी केली. त्यानंतर भाजपशी हातमिळवणी करून आपले सरकार स्थापन केले. त्यामुळे शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले.

शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची, हा वाद निर्माण झाला आहे. हा वाद आता सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन पोहोचला आहे. मात्र, याबाबत अजून कुठलाच निर्णय झालेला नाही.

दरवर्षी मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेनेकडून दसरा मेळावा घेण्यात येतो. मात्र, आता शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले असल्यामुळे हा मेळावा कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांकडून आपणच दसरा मेळावा घेणार असल्याचेही बोलले जात आहे.

यातच काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी “दसरा मेळाव्याबाबत कोणताच संभ्रम नाही, दसरा मेळावा शिवसेनेचाच होणार” असे वक्तव्य केले होते. तसेच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याच्या परवानगीबाबत त्यांनी महानगरपालिकेकडे दोनदा अर्जही केला होता. परंतु, यावर कुठलेच उत्तर आले नाही.

मात्र, आता हा दसरा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे दसरा मेळाव्याची परंपरा कायम राखणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच दसरा मेळाव्यातून ते जोरदार शक्तिप्रदर्शनही करणार असल्याचे सांगितले जात आहे.

दसरा मेळाव्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांना याबद्दलच्या सूचनाही दिल्या आहेत. या मेळाव्यामध्ये भाजपही सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणेही या मेळाव्याला हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आली आहे.

यावर्षी एकनाथ शिंदेच्या अध्यक्षतेखाली हा दसरा मेळावा पार पडणार आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या या मुद्द्यावरून शिवसेना आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमनेसामने येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच यावर आता शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या
Lalbaugcha Raja : “आतातरी माझ्या मुलीची शेवटची ईच्छा पूर्ण करा” ; रांगेत उभं राहून आत्महत्या केलेल्या मुलीच्या आईचे लालबागच्या राजाला पत्र
Karishma Kapoor: करिष्मा कपूरला आपल्या मित्रांसोबत झोपवणार होता तिचा पती, किंमतही केली होती निश्चित, वाचा किस्सा
Ranbir Kapoor: फक्त ‘या’ कारणांमुळे रणबीर कपूरच्या ‘ब्रम्हास्त्र’समोर फिका पडेल १८०० कोटी कमावणारा ‘बाहुबली’
Arvind Kejriwal : केजरीवालांचे आव्हान भाजपला नाही पेलवले; भाजपला सपशेल तोंडावर आपटवत आपने ‘करून दाखवले’

ताज्या बातम्या मनोरंजन राजकारण

Join WhatsApp

Join Now