राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई बँक घोटाळ्याच्या प्रकरणात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.(filed a fraud case against praveen darekar)
भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मजूर नसतानाही मुंबै बँकेच्या संस्थेची निवडणूक लढवून स्वत:ला मजूर असल्याचे सांगितले. तसेच वीस वर्षे शासनाची फसवणूक केली, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १९९, २००, ४६५ आणि ४६८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लेबर फेडरेशनची निवडणूक झाली होती. त्या वेळी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी स्वत:ला मजूर म्हणवून घेत उमेदवारी नोंदविली होती. यावेळी त्यांनी प्रतिज्ञा सहकारी मजूर संस्थेशी संबंधित कागदपत्रे सादर केली होती. या निवडणुकीत भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचा विजय झाला होता.
यावर धनंजय शिंदे यांनी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्याविरोधात फसवणुकीचा आरोप केला आहे. यावेळी आरोप करत असताना धनंजय शिंदे म्हणाले की, “विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे बोगस ‘मजूर’ आहेत आणि ते मुंबई बँक व सरकारची फसवणूक करत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना प्रवीण दरेकर मुंबई बँकचे अध्यक्ष देखील होते.”
“२०१४ ते २०१९ या चार वर्षांच्या कालावधीत प्रवीण दरेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबई बँकेत जवळपास २००० कोटींचा आर्थिक घोटाळा केला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी नियम धाब्यावर बसवत काम केलं आहे. सहकार विभागाच्या चौकशी अहवाल आणि लेखापरीक्षण अहवालात हे स्पष्ट झाले आहे”, असे धनंजय शिंदे यांनी सांगितले.
दोन महिन्यांपूर्वी आम आदमी पक्षाने मुंबई बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. पण रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाणे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते. यानंतर आम आदमी पक्षाने मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे गुन्हा दाखल व्हावा यासाठी पाठपुरावा केला. अखेर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
हिजाबबंदीनंतर आता शाळांमधील मुर्तीपुजा आणि आरत्या देखील बंद व्हाव्यात – असीम सरोदे
काँग्रेसचा गंभीर आरोप, म्हणाले, ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट बनवण्याचा उद्देश काश्मिरी पंडीतांबद्दल कणव नाही तर..
प्रेक्षकांचे मन जिंकण्याच्या नादात..; किरण रावसोबतच्या घटस्फोटावर आमिरने पहिल्यांदाच सोडले मौन