राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर(Pravin Darekar)यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतील(Mumbai) माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात भाजप(BJP)) आमदार प्रवीण दरेकर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई बँक घोटाळ्याच्या प्रकरणात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.(Filed a complaint against Pravin Darekar)
भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मजूर नसतानाही मुंबै बँकेच्या संस्थेची निवडणूक लढवून स्वत:ला मजूर असल्याचे सांगितले. तसेच वीस वर्षे शासनाची फसवणूक केली, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १९९, २००, ४६५ आणि ४६८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लेबर फेडरेशनची निवडणूक झाली होती. त्या वेळी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी स्वत:ला मजूर म्हणवून घेत उमेदवारी नोंदविली होती. यावेळी त्यांनी प्रतिज्ञा सहकारी मजूर संस्थेशी संबंधित कागदपत्रे सादर केली होती. या निवडणुकीत भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचा विजय झाला होता.
यावर धनंजय शिंदे यांनी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्याविरोधात फसवणुकीचा आरोप केला आहे. यावेळी आरोप करत असताना धनंजय शिंदे म्हणाले की, “विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे बोगस ‘मजूर’ आहेत आणि ते मुंबई बँक व सरकारची फसवणूक करत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना प्रवीण दरेकर मुंबई बँकचे अध्यक्ष देखील होते.”
“२०१४ ते २०१९ या चार वर्षांच्या कालावधीत प्रवीण दरेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबई बँकेत जवळपास २००० कोटींचा आर्थिक घोटाळा केला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी नियम धाब्यावर बसवत काम केलं आहे. सहकार विभागाच्या चौकशी अहवाल आणि लेखापरीक्षण अहवालात हे स्पष्ट झाले आहे”, असे धनंजय शिंदे यांनी सांगितले.
दोन महिन्यांपूर्वी आम आदमी पक्षाने मुंबई बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. पण रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाणे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते. यानंतर आम आदमी पक्षाने मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे गुन्हा दाखल व्हावा यासाठी पाठपुरावा केला. अखेर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
आजोबांच्या निधनाने भावूक झाली प्राजक्ता गायकवाड, म्हणाली, ‘सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊ असं म्हणून सोडून गेलात’
घरामध्ये ‘हे’ एक छोटेसे डिव्हाईस बसवून बिनधास्तपणे करा कमाई, महिन्याला कमवा १ लाख रुपये
‘या’ कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, १० हजाराचे झाले ४ कोटी