मुलाचा विवाहसोहळा शाही थाटात करणं धनंजय महाडिकांना पडले महागात; वाचा सविस्तर

मुंबई : कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सण, उत्सव, तसेच लग्न राजकीय कार्यक्रम हे साध्या पद्धतीने केले जात आहेत. मोठे कार्यक्रम करण्यावर सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. तरीसुध्दा काहींनी मोठे राजकीय कार्यक्रम, विवाह सोहळे आयोजित करत सरकारचे नियम धाब्याबर बसवले आहेत.

कोल्हापुरचे भाजप नेते, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा पुण्यातील मगरपट्टा सिटीतील लक्ष्मी लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला महाविकास आघाडी सरकारमधील आणि भाजपमधील अनेक मोठे नेते उपस्थित होते.

या सोहळ्यात कोरोनाचे नियम पाळण्यात न आल्याचे आता समोर आले आहे. सोशल डिस्टंन्सिग, मास्क घालणे आणि २०० पेक्षा कमी लोकांची उपस्थिती या नियमांचा फज्जा उडवल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. अखेर माजी खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनंजय महाडिक यांचे सूपुत्र पृथ्वीराज यांच्या विवाहसोहळ्याला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, शिवसेना नेते संजय राऊत, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक मोठे राजकीय नेते उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या
खासदार डेलकर मृत्यू प्रकरणातला गुंता वाढला! पोस्टमार्टम रिपोर्टमधून झाला धक्कादायक खुलासा…
जयंत पाटलांनी केला भाजपचा करेक्ट कार्यक्रम; महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा
बाबा रामदेव यांना अटक होणार? WHO म्हणते, ‘आम्ही प्रमाणपत्र दिलं नाही’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.