“भारतीय संविधानाचा अपमान केल्याप्रकरणी प्रविण तरडेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा”

पुणे | जगभरात गणपती उत्सवानिमित्त आज मोठ्या भक्तीभावाने आगमन झाले आहे. कोरोना संकटामुळे अनेकांना डेकोरेशन करण्यासाठी फुले, साहित्य, तोरणे मिळालेली नाहीत. यामुळे काहींनी वेगवेगळ्या कल्पना लढवून त्यांच्या घरी बाप्पाचे स्वागत केले आहे. मात्र अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यावरुन वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 

प्रविण तरडेच्या यांनी घरच्या गणपतीची पुस्तकांचे मनोरे रचत प्रतिष्ठापना केली आहे. कल्पना चांगली होती मात्र, गणपतीच्या मूर्तीच्या पाटाखाली संविधानाची प्रत ठेवल्याने वादाला तोंड फुटले आहे.

त्यामुळे तमाम भारतीयांनी तरडे यांच्या या कृतीबद्दल चिड आणि संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात लढा यूथ मूव्हमेंटने पिंपरी-चिंचवड आयुक्त यांना प्रविण तरडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

आज दिनांक 22/08/2020 रोजी सकाळी मराठी चित्रपट दिग्दर्शक प्रविण तरडे याने गणेश उत्सवानिमित्त केलेल्या डेकोरेशन मध्ये भारतीय संविधानाच्या पुस्तकावर गणेशाची मूर्ती ठेवून तमाम भारतीयांच्या भावना दुखावण्याचा निंदनीय प्रकार केला आहे. अशा प्रवृत्तींना धडा शिकवण्यायोग्य धडा शिकवण्यात येईल, असे संस्थेचे अध्यक्ष प्रमोद क्षीरसागर यांनी निवेदनात म्हणाले आहेत.

दरम्यान, प्रविण तरडे यांनी आपली पोस्ट डिलीट केली आणि त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून तमाम भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे जाहीर माफी मागितली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.