बापाची अस्थी घेण्यासाठी आलेल्या तीन लेकांमध्ये स्मशानभूमीतचं संपत्तीवरून तुफान हाणामारी

भीलवाडा | देशात कोरोनामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाची भीती अनेकांच्या मनात आहे. दिवसेंदिवस देशात काळिज पिळवटून टाकणारं चित्र दिसत आहे. अशातच राजस्थानमध्ये एका स्मशानभूमीतल्या वादाची घटना समोर आली आहे.

पैसा आसूनही  कोरोनामुळे जीव गमावले आहेत. कोट्यावधी रुपयांची संपत्ती जवळ असणाऱ्यांनाही कोरोनाने हिरावले आहे. राजस्थानच्या भीलवाडामध्ये चक्क संपत्तीच्या वादावरून स्मशानभूमीतच तीन भावांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे.

भीलवाडा पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात एका वृध्द व्यक्तीचा मृत्यू झाला होता. व्यक्तीचं अंत्यसंस्कार केल्यानंतर तीसऱ्या दिवशी नातेवाईक आणि त्या व्यक्तीची तीन मुलं धर्म सिंह राव, रघूनाथ राव आणि पप्पू राव अस्थी नेण्यासाठी स्मशानभूमीत आले होते.

अस्थी जमा करत असतानाच या तीन भावांमध्ये स्मशानभूमीतचं संपत्तीचा विषय निघाला आणि याच वादातून तीनही मुलं एकमेकांच्या अंगावर धावली. एकमेकांना  लाथाबुक्क्यांचा प्रसाद देण्यात आला. यावेळी वाद वाढतच चालला होता.

नातेवाईकांनी आणि तिथे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांनी तिघांना समजवण्याचा खुप प्रयत्न केला. मात्र तिघेजण कुणाचंही  ऐकायला तयार नव्हते. अखेर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ स्मशानभूमी गाठून तिघांना शांत केले आणि घरी जाण्यास सांगितलं.

दरम्यान या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आत्म्याला शांती लागत नाही. तोवरच मुलांमध्ये संपत्तीवरून तुफान हाणामारी झाली. सोशल मिडियावर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सध्या या प्रकाराची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे.
महत्वाच्या बातम्या-
सुरेश रैनाने ट्विट करत ऑक्सीजन मागीतला; सोनू सूद म्हणाला १० मिनीटांत पाठवतो भावा
भावाचा नाद नाय! हाय हिल्स घालून असा धावला की थेट वर्ल्ड रेकॉर्डच केला; पहा व्हिडिओ
काय सांगता! ट्विंकल खन्नाला लहानपणी होती मिशी; मित्र करण जोहरचा खुलास

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.