Share

क्रिकेट खेळण्यासाठी कॅन्सरशी लढला अन् ठोकल्या ५४८ धावा, पुर्ण देशात ‘या’ नव्या युवराजची चर्चा

रणजी करंडक स्पर्धेत उत्तराखंड संघाने चमकदार कामगिरी केली आहे. उत्तराखंड संघाच्या कामगिरीत २१ वर्षीय युवा फलंदाज कमलसिंग कानिहालने मोलाची भूमिका बजावली आहे. पण उपांत्य फेरीत उत्तराखंड(Uttarakhand) संघाला मुंबईकडून पराभव स्विकारावा लागला आहे. उत्तराखंड संघाचा ७२५ धावांनी पराभव झाला आहे. (Fighting cancer to play cricket kamal singh new yuvraj singh )

उत्तराखंड संघाचा खेळाडू कमलने रणजी करंडक स्पर्धेतील दहा सामन्यांमध्ये तब्बल ५४८ धावा केल्या आहेत. कमलसिंगने २०२० मध्ये महाराष्ट्राविरुद्धच्या पहिल्या प्रथम श्रेणी सामन्यात शतक झळकावले होते. या सामन्यात कमलसिंगने १०१ धावा केल्या होत्या. २०२०-२१ मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये देखील कमलसिंगने चांगली कामगिरी केली होती.

या स्पर्धेमध्ये कमलसिंगने सर्वाधिक धावा केल्या आहेत. कमलला लहान वयात कॅन्सरसारख्या आजाराचा सामना करावा लागला होता. पण त्याने धैर्याने या आजाराला लढा देत क्रिकेटमध्ये आपले करिअर घडवले आहे. कमलसिंगला १४ व्या वर्षी ब्लड कॅन्सरचे निदान झाले होते. त्याच्या ब्लड प्लेटलेट्स खूप कमी झाल्या होत्या.

यामुळे त्याच्या कुटूंबियांना मोठा धक्का बसला होता. कॅन्सरच्या उपचारासाठी कमलसिंग अनेक महिने रुग्णालयात होता. यामुळे तब्बल एक वर्ष कमलसिंगला क्रिकेटखेळता आलं नाही. याबद्दल सांगताना कमलसिंग म्हणाला की, “मला क्रिकेटमुळे या आजाराशी लढण्याचं धैर्य मिळालं. मी क्रिकेटच्या मैदानात कधी परतणार? असा विचार रुग्णालयात असताना माझ्या मनात नेहमी यायचा”, असे कमलसिंगने सांगितले.

कमलसिंग पुढे म्हणाला की, “पुन्हा क्रिकेट खेळण्याचे माझे स्वप्न होते. त्यासाठी लागणारी इच्छाशक्ती देखील माझ्याजवळ होती. त्यामुळेच मला कॅन्सर सारख्या आजारावर मात करता आली. उपचारानंतर लवकरात लवकर फिट होण्याचा मी विचार करत होतो. त्यासाठी मी खूप मेहनत घेतली “, असे कमलसिंगने सांगितले.

उत्तराखंड संघाचा युवा फलंदाज कमलसिंग कानिहाल हा भारताचा माजी डावखुरा फलंदाज गौतम गंभीरचा मोठा चाहता आहे. कॅन्सरवर उपचार घेत असताना डॉक्टरांनी कमलसिंग कानिहालला भारताज माजी फलंदाज युवराज सिंगचे उदाहरण दिले होते. यामुळे आपल्याला खूप प्रेरणा मिळाल्याचे कमलसिंगने सांगितले.

महत्वाच्या बातम्या :-
रत्नागिरी हळहळलं! मुलाचं लग्न जुळत नव्हतं म्हणून आईनं उचललं धक्कादायक पाऊल
IPL गाजवल्यानंतर पुणेकर राहुल त्रिपाठीला मिळाली टिम इंडियात जागा, भावूक होत म्हणाला…
अंबानी-अदानींचा फोटो पोस्ट करुन मिटकरींचा फडणवीसांना टोला; म्हणाले, अहो दाजी हेच का ते…

ताज्या बातम्या इतर खेळ

Join WhatsApp

Join Now