हनुमानाच्या जन्मस्थळावरून सध्या वाद सुरु आहे. किष्किंदाचे मठाधिपती गोविदानंद स्वामी सरस्वती यांनी हनुमानाच्या जन्मस्थळावर प्रश्न उपस्थित केला होता. यामुळे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमधील(Trimbakeshwar) ग्रामस्थ आणि साधू संत संतापले होते. त्यांनी किष्किंदाचे मठाधिपती गोविदानंद स्वामी सरस्वती यांचा विरोध केला होता. (fight between two sadhu video viral)
यानंतर आज हनुमानाच्या जन्मस्थळावरून उभ्या राहिलेल्या वादावर चर्चा करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी सर्व धर्म प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते. या सभेत सुरवातीला आसन व्यवस्थेवरून धर्म प्रतिनिधींमध्ये वाद झाला. यानंतर धर्म प्रतिनिधींमध्ये पुन्हा चर्चा सुरु झाली. त्यानंतर काही वेळाने धर्म प्रतिनिधींमध्ये वाद झाला.
या वादादरम्यान सुधीरदास पुजारी यांनी संतापात सरस्वती गोविंद गिरींवर माइक उगारला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुधीरदास पुजारी यांनी माइक उगारल्यानंतर सरस्वती गोविंद गिरी चर्चेतून निघून जात होते. यावेळी इतर धर्म प्रतिनिधींनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.
https://twitter.com/Aruneel_S/status/1531592880829222920?s=20&t=8jSUe1ptA1rtaS0mY0yK-g
मिळालेल्या माहितीनुसार, आज नाशिकमध्ये हनुमानाच्या जन्मस्थळावरील वादावर चर्चा करण्यासाठी सभा बोलवण्यात आली होती. या सभेसाठी देशातील सर्व धर्म प्रतिनिधी उपस्थित होते. या सभेत धर्म प्रतिनिधींमध्ये आसन व्यवस्थेवरून वाद निर्माण झाला. गोविदानंद स्वामी सरस्वती सभेत वर येऊन बसले. यावर इतर साधूंनी विरोध केला आणि गोविदानंद स्वामी सरस्वती यांना खाली बसण्यास सांगितले.
“तुम्ही विद्वान असाल, पण इतर साधूंचा मान राखा”, अशा शब्दांत गोविदानंद स्वामी सरस्वती यांना इतर साधूंनी खडसावले. यानंतर सुधीरदास पुजारी यांनी गोविंद गिरींचे गुरु यांच्यावर काँग्रेसी असल्याचा आरोप केला. यामुळे गोविंद गिरी संतापले. सुधीरदास पुजारी यांनी माफी मागावी, अशी मागणी गोविंद गिरी यांनी केली आहे.
यानंतर गोविंद गिरी आणि सुधीरदास पुजारी यांच्यात वाद झाला. या वादात सुधीरदास पुजारी यांनी आवाज चढवत गोविंद गिरी यांच्यावर माइक उगारला आहे. या घटनेमुळे सभेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
PHOTO: छोट्या टॉपमध्ये टोन्ड बॉडी दाखवत करिश्मा कपूरने सगळ्यांना केलं थक्क, एवढ्या वयातही दिसते हॉट
दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित असणाऱ्या महिला शिक्षिकेसोबत केले ‘हे’ भयानक कृत्य, शाळेत घुसले अन्…
मिनाक्षी शेषाद्रीची मुलगी केंद्रासमोर सारा आणि जान्हवीही होतील फेल, फोटो पाहून व्हाल घायाळ