पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहामधील कार्यक्रमात आज भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमावेळी भाजप(BJP) आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे.(fight between bjp and rashtrvadi in pune)
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आज पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजप कार्यकर्त्यांची तुडुंब गर्दी होती. या कार्यक्रमाला भाजपच्या महिला नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी देखील उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी भाषण करणार होत्या. राष्ट्रवादी पक्षाच्या काही महिला कार्यकर्त्या या कार्यक्रमाला शांतपणे येऊन बसल्या होत्या. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या भाषणाला सुरवात होण्यापूर्वी राष्ट्रवादी पक्षाच्या काही महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात घोषणा देण्यास सुरवात केली.
यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना विरोध करण्यास सुरवात केली. यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आहे. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे.
या वादातून भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या एका महिला कार्यकर्त्याला मारहाण केली असल्याची माहिती मिळत आहे.पोलिसांनी तातडीने पाऊल उचलत राष्ट्रवादी पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांना सभागृहाबाहेर काढले. या संपूर्ण घटनेमुळे सध्या बालगंधर्व नाट्यगृह परिसरात सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.
भाजपच्या महिला नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी वास्तव्यास असलेल्या हॉटेलसमोर आंदोलन केलं आहे. इंधन दरवाढीवरून आणि महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
नगरच्या शेतकऱ्याची लेक आता महिला आयपीएल गाजवणार; गावातच घेतलेत क्रिकेटचे धडे
रितेश देशमुख माधुरी दिक्षीतसोबच नाच नाच नाचला; व्हिडीओ पाहून तुम्हीही खुश व्हाल
‘कोण आहे ती केतकी? काय लायकी तिची?’ केतकी चितळे प्रकरणावर जेष्ठ अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया