Share

महिला पोलीस अधिकाऱ्याने होणाऱ्या नवऱ्यालाच ठोकल्या बेड्या, जाणून घ्या नेमकं प्रकरण

आसाममधील शिवसागर जिल्ह्यातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याने(Police Officer) आपल्याच होणाऱ्या नवऱ्याला अटक केली आहे. या आरोपीने महिला पोलीस अधिकाऱ्याला फसवणूक करून लग्नाच्या जाळयात ओढण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार महिला पोलीस अधिकाऱ्याच्या लक्षात येताच तिने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.(female police officer arrest fiaonse)

मिळालेल्या माहितीनुसार, आसाममधील गुवाहाटीजवळ असणाऱ्या नौगाव पोलीस ठाण्यात जोनमाई राभा या उपनिरीक्षक पदावर काम करत आहेत. राणा पगाग आणि पोलीस उपनिरीक्षक जोनमाई राभा यांचे लग्न होणार होते. पण त्यापूर्वी जोनमाई राभा यांना आपली फसवणूक होत असल्याचा संशय आला.

राणा पगाग याने पोलीस उपनिरीक्षक जोनमाई राभा यांना खोटी ओळख करून दिली होती. जोनमाई राभा यांनी केलेल्या तपासात राणा पगाग याचा भांडाफोड झाला. राणा पगाग आणि पोलीस उपनिरीक्षक जोनमाई राभा यांचा गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये साखरपुडा झाला होता. या वर्षी नोव्हेंबर २०२२ मध्ये ते दोघे लग्न करणार होते.

राणा पगाग याने स्वत:ची ओळख सरकारी तेल कंपनी ओएनजीसीचा मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून करून दिली होती. तो सातत्याने पोलीस उपनिरीक्षक जोनमाई राभा यांची भेट घेत असे. भेट घेण्यासाठी येताना तो भाड्याने कार घेऊन यायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक जोनमाई राभा यांनी खात्री करून घेण्यासाठी राणा पगाग याची माहिती घेण्यास सुरवात केली.

त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे पोलीस उपनिरीक्षक जोनमाई राभा यांना समजले. यानंतर पोलीस उपनिरीक्षक जोनमाई राभा यांनी स्वतः आपला होणार नवरा राणा पगाग याला अटक केली. राणा पगाग याला दोन दिवसांमध्ये न्यायालयात हजर केले जाणार आहे. या सर्व प्रकरणावर पोलीस उपनिरीक्षक जोनमाई राभा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फसवणूक, खोटी कागदपत्रे सादर करणे, लोकांची पैशांची फसवणूक करणे, असे आरोप राणा पगाग यांच्यावर करण्यात आले आहेत. जो चुकीच्या गोष्टी करेल, त्याला मी सोडणार नाही, भलेही ती व्यक्ती माझा होणारा नवरा का असेना, असे पोलीस उपनिरीक्षक जोनमाई राभा यांनी संगितले आहे. या घटनेची सध्या संपूर्ण परिसरात चर्चा होत आहे.

महत्वाच्या बातम्या :-
… तरच अर्जुन तेंडुलकरला खेळण्याची संधी मिळणार, मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकाने स्पष्टच सांगितले
दिल्लीतील मोफत विजेची सर्वांना मिळणारी सुविधा बंद; केजरीवालांनी घेतला मोठा निर्णय
तीनदा पाकिस्तानी सैन्याला पळवून लावलं, छातीवर गोळ्या झेलल्या; वाचा एका धाडसी जवानाची गोष्ट

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now