मुक्या प्राण्याला पाव खायला घालणे वृध्दाच्या आले अंगलट, वनविभागाने बजावली नोटीस

सातारा | सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. व्हिडिओ पाहून नेटकरी व्हिडिओबद्दल चर्चा करत असतात. काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर एक व्हिडियो व्हायरल झाला होता. त्यामध्ये एक वृध्द व्यक्ती रान गव्यांना खायला घालत होता. व्हिडिओ पाहून अनेकजणांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील इब्राहिम महमंद पटेल हे वृध्द शेतकरी मुक्या प्राण्यावर असलेल्या प्रेमापायी रान गव्यांना पाव खायला घालत होते.

इब्राहिम पटेल यांच्या शेतात रोज संध्याकाळी गवे येत होते. ते कुणालाच कोणतीही दुखापत करत नव्हते. पटेल हे त्या गव्यांना पाव खायला देऊ लागले. त्यानंतर गवे रोज त्या ठिकानी येऊन पटेल यांनी टाकलेले पाव खाऊ लागले. रोजचा हा दिनक्रम सुरू झाल्याने पटेल आणि त्या जंगली गव्यांची चांगलीच मैत्री जमली.

काही दिवसांनी पटेल हे त्या गव्यांना मायेने स्वत:च्या हाताने भरवू लागले. सोशल मिडियावर पटेल यांचा प्राण्यांना खायला घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर त्याची दखल वनविभाने घेतली आहे.

महाबळेश्वरचे वनक्षेत्रपाल दिलीप झगडे यांनी पटेल यांना नोटीस बजावली आहे. त्यामध्ये पटेल यांना प्राण्यांना खायला घालणे थांबवण्यास सांगण्यात आलं आहे. प्राणी प्रेमींनीही वन्य प्राण्यांना खायला घालणे हे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.

वन्य प्राणी लोकांवर कधीही गंभीर हल्ला करू शकतात. प्राण्यांच्या सहवासात आल्याने त्यांच्यातील आजार आपल्याला होऊ शकतो, त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. असं प्राणी प्रेमींनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-
काय सांगता! एकाच वेळी दोघींना डेट करत होते बिहारी बाबू शत्रुघ्न सिन्हा; बघा कोण होत्या ‘त्या’ दोघी
उदयनराजेंनी दिली विष पिऊन आत्महत्या करण्याची धमकी
दुर्देवी! आईची सरपंच पदी निवड झाली, अन् विजयी मिरवणूकीतच लेकाने सोडला प्राण
पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता दीदीच, जाणून घ्या पाच राज्यात कोणाला कुठे मिळणार सत्ता

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.