व्हा गुंतवणुकदार! अमित शहांनी ‘या’ योजनेत गुंतवले लाखो रुपये, जाणून घ्या फायदा आणि व्याजदार

मुंबई | जीवनात आर्थिक गुंतवणुक प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे. भविष्याचा विचार करून गुंतवणुक करणं काळाची गरज बनली आहे. कोरोनासारख्या महामारीत सर्वांनाच गुंतवणुकीच महत्त्व प्रभावीपणे समजले असेल. यानंतर आता तुम्ही पुन्हा गुंतवणुक करण्याचा विचार करत असाल. मात्र नव्याने ती कुठे आणि कशी करायची हा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी ही पुर्ण बातमी वाचा.

गुंतवणुक सुरक्षित आणि चांगल्या नफ्यासोबत उत्तम परतावा मिळेल अशा ठिकाणी करायची असते. तर आज बाजारात पाहिल्यानंतर अनेक योजना आपल्यासाठी उपलब्ध आहेत. यापैकी बहुतेक लोक दुसऱ्याच्या सांगण्यावरून किंवा दुसऱ्याने केलेल्या ठिकाणी गुंतवणुक करत असतात. हे खूपदा ते धोकादायक ठरते. पण आज दुसऱ्यानेच केलेल्या गुंतवणुकीचा आपल्याला फायदा होणार आहे. कारण या गुंतवणुकदाराचे नाव आहे गृहमंत्री अमित शहा.

गृहमंत्री अमित शहा यांनी अनेक ठिकाणी गुंतवणुक केली आहे. यामध्ये गृहमंत्री शहा यांनी तब्बल ९ लाखांहून अधिक रक्कम बँकेत फिक्स्ड डिपॉझिट(FD) च्या स्वरुपात ठेवली आहे. यासंदर्भात संपुर्ण माहिती www.pmindia.gov.in या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

काय आहे ही योजना?
गुंतवणुकीचा सगळ्यात उत्तम पर्याय म्हणून अनेक लोक एफडीची निवड करतात. यामध्ये धोका खूप कमी असतो. महत्त्वाच म्हणजे या योजनेत तुम्हाला सरकारी गॅरंटी मिळते. यावर व्याज वार्षिक मिळत असेले तरी व्याजदराची मोजणी तिमाही आधारावर केली जाते. यासाठी तुम्ही कोणत्याही बँक किंवा पोस्टाच्या ऑफिसमध्ये जाऊ शकता.

SBI चे FD व्याजदर पुढील प्रमाणे*-
७-४५ दिवस – २.९० टक्के व्याज
४६-१७९ दिवस – ३.९० टक्के व्याज
१८० दिवस – १ वर्ष- ४.४० टक्के व्याज
३-५ वर्ष – ५.३० टक्के व्याज
५-१० वर्ष – ५.४० टक्के व्याज
SBI जेष्ठांना ०.५ टक्क्यांनी अतिरिक्त व्याज देते.

महत्वाच्या बातम्या-
लखपती बनण्याची सुवर्णसंधी! पोस्टाच्या ‘या’ योजनांमध्ये गुंतवणुक करून मिळवा भरघोस परतावा
मोठी बातमी! नाना पटोले यांनी दिला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा
मारुती सुझुकी लवकरच बाजारात आणणार नवीन इलेक्ट्रिक OMNI, किंमत असेल फक्त…
अभिमानास्पद! गवंड्याची मुलगी झाली केंद्रीय पोलिस दलामध्ये भरती, आई-वडीलांचे पाणावले डोळे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.