दिल्ली । बँकेत FD करणारांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. तुमच्यासाठी एक मोठी संधी चालून आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने फिक्स्ड डिपॉझिटच्या व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने व्याजदरात 0.2 टक्केची वाढ केली आहे. जे दोन वर्षांसाठी एफडी करतील. त्यांना हा फायदा होणार आहे.
२ वर्ष आणि ३ वर्षापेक्षा कमीच्या मॅच्युरिटीच्या एफडीवर आता ५.४ टक्के व्याज मिळेल. अगोदर हा व्याजदर ५.२ टक्के मिळत होता. याशिवाय ३ ते १० वर्षांच्या मॅच्युरिटीच्या एफडीवर व्याजदर ५.३ वरून वाढवून ५.५ टक्के केला आहे. यामुळे याचा फायदा होणार आहे.
प्रायव्हेट एचडीएफसी बँकेने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँकेने काही कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात कपात केली आहे. बँकेने व्याजदरात ०.२० टक्केची कपात केली आहे. बँकेच्या १ वर्षाच्या डिपॉझिटवर व्याजदर ०.२० टक्के कमी करण्यात आला आहे. तर, २ वर्षाच्या डिपॉझिटवर बँकेने व्याजदर ०.१० टक्के कमी केला आहे.
एचडीएफसी बँक ७ दिवस ते २९ दिवसांच्या डिपॉझिटवर २.५० टक्के व्याज ऑफर करत आहे. ३०-९० दिवसात मॅच्युअर होणार्या डिपॉझिटवर हा रेट ३ टक्के आहे. यामुळे हा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे.
बँकेच्या सुधारित दरात ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का व्याज जास्त मिळेल. व्याजदरात दुरूस्तीनंतर २ ते १० वर्षांच्या मॅच्युरिटी पीरियडच्या फिक्स्ड डिपॉझिटवर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये कॅनरा बँक सर्वात जास्त व्याज देत आहे. गेल्या काही दिवसांपासून बँका देखील मेटाकुटीला आल्या आहेत, मात्र तरी देखील या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.