धक्कादायक! बापाने २ वर्षाच्या पोटच्या मुलाला विकलं अन् गर्लफ्रेंडसोबत गेला मजा मारायला

आई-वडिल कितीही गरीब असेल, पण ते आपल्या पोटच्या मुलाची खुप काळजी घेतात. बाळ आजारी असेल, तर आई दिवसरात्र त्याच्यासाठी जागते. तर आपल्या बाळाला काही हवे असेल, वडिल त्याला हवे ते आणून देतात.

पती-पत्नींमध्ये कितीही वादविवाद झाले तर त्या गोष्टीचा परीणाम ते आपल्या बाळावर होऊ देत नाही. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका घटनेबद्दल सांगणार आहोत, ज्या घटनेने वडिलांच्या नावाला काळीमा फासला आहे.

आपल्या गर्लफ्रेंडसाठी एका माणसाने आपल्या बायकोला तर सोडलेच आहे. त्यासोबत त्याने आपल्या दोन वर्षाच्या पोटच्या बाळाला विकले आहे आणि मिळालेल्या पैशातून आपल्या गर्लफ्रेंडसोबत फिरायला गेला आहे.

ही धक्कादायक घटना चीनमधली आहे. त्या व्यक्तीचे आपल्या पत्नीसोबत नेहमी भांडण व्हायचे. त्यामुळे त्यांनी एकमेकांपासून दूर व्हायचा निर्णय घेत एकमेकांना घटस्फोट दिला. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन मुली होते. त्यामुळे मुलीची कस्टडी आईला तर मुलाची कस्टडी बापाला मिळाली.

काम करत असल्याने त्या माणसाने आपल्या मुलाला दुसऱ्या शहरात भावाकडे ठेवले होते. त्यानंतर तो पुन्हा भावाकडे गेला आणि त्याच्या आईला त्याला भेटायचंय असे सांगून घेऊन गेला. त्यानंतर त्याने त्या मुलाला एका दाम्पत्याला विकून टाकले. त्याने ते २४ हजार डॉलर्स म्हणजेत १७ लाख रुपयांना विकून टाकले.

दरम्यान, भावाने मुलाला परत आणले,नाही म्हणून त्याच्या भावाला चिंता वाटू लागली. त्याने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. तेव्हा हा सर्वप्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर त्या माणसाला पोलिसांनी अटक केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

VIDEO:‘त्या’ अभिनेत्रीला मिठी मारणे रितेशला पडले महागात, घरी गेल्यानंतर जेनेलियाने धु-धु धुतला
‘इंडियन आयडल १२’ मध्ये नेहा कक्कड ऐवजी अनु मलिक जज म्हणून येणार; जाणून घ्या त्यामागच कारण
टेलिव्हिजनवर मोठा ब्रेक मिळण्याअगोदर ‘या’ अभिनेत्रींनी बी ग्रेड चित्रपटांमध्ये केले आहे काम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.