बाप रे..! एका शिक्षकामुळे ८ जणांना कोरोनाची लागण तर चार विद्यार्थी पॉझिटिव्ह

जव्हार | शासकीय आश्रमशाळा न्याहाळे येथील एका शिक्षकाने काही दिवसांपूर्वी तेथील १०६ विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले. मात्र त्या शिक्षकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

त्याचबरोबर चार विद्यार्थी, तीन कर्मचारी व एक पालक अशा आठ जणांचे रिपोर्ट नुकतेच पॉझिटिव्ह आल्याची घटना घडली आहे.

दरम्यान, लागण झालेला शिक्षक एका प्रतिबंधित इमारतीत राहत होता. पूर्वी त्या इमारतीत एक रुग्ण आढळून आला होता. त्याच शाळेतील एका कर्मचाऱ्याला गावाकडे जायचे म्हणून तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह आला आहे.

याच दरम्यान हा शिक्षक त्यांच्या संपर्कात आला. कळत नकळत हेच शिक्षक शाळेत पुस्तके वाटप करण्यासाठी आले होते.

१०६ विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय अशा एकूण २५० व्यक्तींची चाचणी झाली असून यातील चार विद्यार्थ्यांना लागण झाली आहे. १४ ते १५ वयोगटांतील हे सर्व विद्यार्थी आहेत

ही अतिशय धक्कादायक बाब असून यामुळे ग्रामीण भागात प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.