बाप रे..! वडिलांनी अभ्यासासाठी दिला मोबाईल; मुलाने पब्जीमध्ये उडवले तब्बल १७ लाख

नवी दिल्ली | कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा, कॉलेजेस बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र अनेक शाळांचे ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू झाले आहेत.

त्यामुळे पालक आपले मोबाईल मुलांना अभ्यासासाठी देत आहेत. मात्र मुलांचे प्रताप ऐकून तुम्हालाही बसेल धक्का, एका मुलाने पब्जी गेम खेळत वडिलांच्या खात्यातून चक्क १७ लाख उडवल्याची घटना घडली आहे.

पंजाबमधल्या या १७ वर्षांच्या मुलाने पालकांचा मोबाईल घेऊन अभ्यास नाही, तर मोबाईल गेम मध्ये डोके घातले. त्याने पब्जी डाउनलोड करून तो मित्रांसोबत हा गेम खेळत होता.

त्याला गेमचे व्यसन लागल्याने तो त्यावर पैसेही उडवत होता. त्याच मोबाईलमध्ये त्याच्या वडिलांचे तीन बँकेंचे मोबाईल अॅप डाऊनलोड केले होते. मुलाला त्याचे पासवर्डही माहित होते.

मोबाइलद्वारे वडिलांचे पैसे काढून तो हे पैसे खेळात मित्रांसोबत उडवायचा. व्यवहार झाल्यानंतर तो आलेले मेसेज लगेच डिलीट करत होता. त्यामुळे पालकांना काही दिवस तो प्रकार समजला नाही.

नंतर त्याच्या वडिलांनी जेव्हा आपली अकाऊंट्स चेक केली त्यानंतर त्यांना सगळा प्रकार लक्षात आला. त्यानंतर हा प्रकार उगडकिस आला आहे.

त्यामुळे मुलांच्या हाती मोबाईल देतांना पालकांनीच काळजी घेतली पाहिजे. आपली मुले त्यावर काय करतात याची माहिती त्यांनी सतत घेतली पाहिजे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.