‘सुशांतच्या संपत्तीबाबत वडिलांनी घेतला मोठा निर्णय; संपत्तीच्या वारसदारांची केली घोषणा’

 

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने १४ जूनला वांद्रेच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती.  मात्र सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्यापही समोर आलेले नाही.

आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. अशात आता सुशांतचे वडील के के सिंग यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सुशांतच्या संपत्तीचे कायदेशीर वारसदार म्हणून स्वतःचे नाव त्यांनी घोषित केले आहे.

मी सुशांत सिंग राजपुतच्या पूर्ण संपत्तीचा कायदेशीर वारसदार आहे. सुशांतने ज्या वकील, सीए आणि इतर कर्मचाऱ्यांना ठेवले होते, तसेच जे लोक त्याच्यासाठी काम करत होते त्यांना आता सुशांतबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, असे के के सिंग यांनी म्हटले आहे.

तसेच सुशांत संदर्भात कोणालाही काही बोलायचे असेल त्यांना माझी परवानगी घ्यावी लागेल. सुशांतच्या कुटुंबात मी आणि त्याच्या बहिणींचा समावेश आहे, असेही सुशांतच्या वडिलांनी म्हटले आहे.

आमच्या शिवाय कोणीही कुटुंबाचे सदस्य नाही, तसेच कोणी असा दावा करत असेल तर मी त्याला परवानगी देत नाही, असेही के के सिंग म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.