Share

Rishi Sunak : जावई ऋषी सुनक पंतप्रधान बनल्यानंतर सासरे नारायण मूर्तींनी दिली पहीली प्रतिक्रिया, म्हणाले…

Narayan Murti Rishi Sunak

Rishi Sunak : इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी त्यांचे जावई ऋषी सुनक यांना ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, ऋषी युनायटेड किंगडममधील लोकांसाठी अधिक चांगले काम करतील असा मला विश्वास आहे. विशेष म्हणजे, ऋषी सुनकचे लग्न इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षतासोबत झालेले आहे. स्टॅनफोर्ड येथे एमबीए अभ्यासक्रमादरम्यान दोघांची भेट झाली होती. ऋषी आणि अक्षता यांना कृष्णा आणि अनुष्का नावाच्या दोन मुली आहेत.

भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनले आहेत. भारतासाठी ही अभिमानाची बाब आहे. ब्रिटनमध्ये इतक्या मोठ्या पदावर पोहोचलेले ते पहिले भारतीय आहेत. पेनी मॉर्डोंट यांनी आपले नाव मागे घेतल्यानंतर ऋषी पंतप्रधान होणार हे निश्चित झाले होते. ऋषी सुनक यांच्या समर्थनार्थ १८० हून अधिक खासदार होते.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील ऋषी सुनक यांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, ‘ऋषी सुनक यांचे मनःपूर्वक अभिनंदन. तुम्ही यूकेचे पंतप्रधान होताच, मी जागतिक समस्यांवर एकत्र काम करण्यास आणि रोडमॅप २०३० ची अंमलबजावणी करण्यास उत्सुक आहे. आपल्या ऐतिहासिक संबंधांना आधुनिक भागीदारीत रूपांतरित करत असताना यूकेमधील भारतीयांच्या ‘लिव्हिंग ब्रिज’ला दिवाळीच्या विशेष शुभेच्छा.’

ऋषी सुनक यांचा जन्म १२ मे १९८० रोजी साउथम्प्टन, यूके येथे झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते आणि आई मेडिकल चालवत होती. ऋषीच्या आजी-आजोबांचा जन्म पंजाब प्रांतात (ब्रिटिश भारत) झाला होता. या अर्थाने ऋषींची मुळे भारताशी जोडलेली आहेत. ऋषी सुनक तीन भावंडांमध्ये सर्वात मोठे आहेत.

सुनक यांच्या वडिलांचा जन्म केनियामध्ये झाला असून आई टांझानियाची आहे. ऋषी सुनक यांनी यूकेच्या विंचेस्टर कॉलेजमधून राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते ऑक्सफर्ड विद्यापीठात गेले. ऋषी सुनक यांनी तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र आणि एमबीएचे शिक्षण घेतले आहे.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ऋषी सुनक यांनी गोल्डमन सॅच या बँकेमध्ये काम केले. नंतर त्यांनी स्वतःची कंपनी स्थापन केली. ऋषी सुनक यांची वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी हाऊस ऑफ कॉमनमध्ये निवड झाली होती.

महत्वाच्या बातम्या
ashish nehra : ब्रिटनचे पंतप्रधान झाले ऋषी सुनक पण ट्विटरवर ट्रेंड झाला आशिष नेहरा; जाणून घ्या यामागचं खरं कारण
Prime Minister:  शब्द ऋषी सुनक यांना पडलं महागात, पंतप्रधान शर्यतीत पडले मागे, आपल्याच पायावर मारली कुऱ्हाड
Rishi Sunak : VIDEO : याला म्हणतात संस्कृती! ब्रिटनचे पंतप्रधानपदाचे उमेदवार ऋषी सूनक यांनी लंडनमध्ये साजरा केला बैलपोळा
Rishi Sunak : “कुणी विचार तरी केला होता का की दिवाळीला एक भारतील ब्रिटनचा पंतप्रधान होईल”

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now