Homeइतरहिंदूत्व सोडून ख्रिश्चन धर्म स्विकारणाऱ्या मुलांना बापाने शिकवला धडा, मंदिराला दान केली...

हिंदूत्व सोडून ख्रिश्चन धर्म स्विकारणाऱ्या मुलांना बापाने शिकवला धडा, मंदिराला दान केली करोडोंची संपत्ती

तामिळनाडूतील कांचीपुरम येथे राहणाऱ्या एका हिंदू व्यक्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या आपल्या मुलांच्या त्रासाला कंटाळून आपले 2 कोटींचे घर दान करण्याचा निर्णय घेतला. 85 वर्षीय कांचीपुरम रहिवासी वेलायथम यांना अशी भिती आहे की, त्यांची दोन मुली आणि एक मुलगा हिंदू विधींनुसार त्यांचे अंतिम संस्कार देखील करणार नाहीत.

या सर्व कारणांमुळे त्यांनी एक धाडसी पाऊल उचलून आपले घर कुमारकोट्टम मुरुगन मंदिराला दान करण्याचा निर्णय घेतला. वृत्तानुसार, तामिळनाडू सरकारच्या आरोग्य विभागात काम करणारे वेलायथम आता निवृत्त झाले आहेत. त्यांच्याकडे 2,680 चौरस फुटांचे घर आहे, ज्याची किंमत 2 कोटी रुपये आहे.

स्थानिक तमिळ दैनिक दिनमलार या वृत्तपत्राशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की मी खूप दुःखी आहे. वेलायुधमने हे घर आपल्या कष्टाच्या पैशातून बांधले होते, पण त्यांच्या तिन्ही मुलांनी ख्रिश्चन मुलींशी लग्न करून तो धर्म स्वीकारला असल्याची व्यथा मांडली. त्यामुळे हिंदू परंपरेनुसार त्यांचे अंतिम संस्कार करण्यासाठी कुटुंबात कोणीही उरले नाही.

ते म्हणाले, एक हिंदू म्हणून माझे अंतिम संस्कार हिंदू परंपरेनुसार झाले पाहिजेत. माझ्या तिन्ही मुलांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. त्यामुळे ते हिंदू परंपरेनुसार माझे अंतिम संस्कार करण्यास पात्र नाहीत. आपल्या कुटुंबापासून वेगळे झालेले वेलायथम पुढे म्हणाले, मी ख्रिश्चन झाल्यानंतर मेलो तरी ते माझे अंतिम संस्कार करणार नाहीत.

पुढे ते म्हणाले की, ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे त्यांना मी माझी संपत्ती देणार नाही. सध्या त्यांची दोन मुले त्यांच्या घराच्या एका भागात राहतात. त्यांना ते म्हणाले, मी आणि माझी पत्नी जिवंत असेपर्यंत ते इथे राहू शकतात पण आमचा मृत्यु झाल्यानंतर मंदिर प्रशासनाला हे घर मिळेल.

वेलायथम यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी HRCE मंत्र्याकडे विक्री करार सादर केला आहे. या जोडप्याच्या मृत्यूनंतर त्यांचे घर मंदिर प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात येणार आहे. बऱ्याच काळापासून, धर्म परिवर्तनावरून कौटुंबिक वादाच्या बातम्या येत आहेत. गेल्या वर्षी, कर्नाटकचे आमदार जी शेखर यांनी विधानसभेत सांगितले की त्यांच्या आईने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि आता घरातील हिंदू प्रथांना त्यांनी विरोध केला आहे.

याआधी गेल्या वर्षी ख्रिश्चन बनलेल्या ग्वाल्हेरच्या धरम प्रताप सिंह यांनी हिंदू रितीरिवाजांनुसार आपल्या आईचे अंतिम संस्कार करण्यास नकार दिला होता. यानंतर त्यांच्या नातवाने आपल्या आजीचे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आणि तो ग्वाल्हेरपासून सुमारे 1100 किमी अंतरावर असलेल्या झारखंडमधून येथे पोहोचला.

2018 मध्ये ओडिशातील गजपती जिल्ह्यातील रहिवासी थाबीर पांडा यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने पत्नी आणि सासूने मारहाण केली होती. अशा अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांचे प्रमाण वाढत चालले आहे. घरच्यांच्या विरोधात जाऊन आंतरजातीय विवाह किंवा धर्मांतर केल्याने अनेक वाद झाल्याचे समोर आले आहे.

महत्वाच्या बातम्या
कॉवेक्सिन घेतल्यानंतर पेनकिलर किंवा पॅरासिटामॉल घेऊ नका, भारत बायोटेकचा लोकांना सतर्कतेचा इशारा
बैलगाडा शर्यतीतील ‘हिरा’, अंडी, दुध, सुका मेवा खाणारा पैलवान बैल; वाचा त्याच्याबद्दल..
नाम ही काफी है! शाहरूख खानचे नाव घेताच विदेशात भारतीय महिलेला मिळाली मोठी मदत
Video: तालिबानने सीमेवरील कुंपण उखडून टाकले; पाकिस्तानी सैन्य तोंड पाहतच राहिले