“वडिलांनी राम मंदिरासाठी मरण पत्करले होते, आम्हालाही भूमिपुजनाचे निमंत्रण मिळायला हवे”

राम मंदिर भूमी पूजन सोहळ्याची तयारी सध्या मोठ्या उत्साहात सुरू आहे. मंदिराचे भूमीपूजन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

राम मंदिरासाठी माझ्या वडिलांनी मरण पत्करले होते. यामुळे आम्हालाही भूमिपूजनचे निमंत्रण मिळायला हवे, असे राम मंदिरासाठी जीव गमावलेल्या कारसेवक संजय कुमार यांच्या मुलीने म्हटले आहे.

2 नोव्हेंबर 1990 रोजी 5 हजार कारसेवकांची तुकडी मंदिराकडे जात होती. यूपी पोलिसांनी हनुमान गढीजवळ गोळीबार केला.

यामध्ये 5 जणांना आपला जीव गमवावा लागला, त्यातच साईन गावचे संजय कुमार सिंहही होते. पोलिसांच्या गोळ्यामध्ये संजय कुमार दगावला आणि त्यांचा मृत्यू झाला होता.

वडिलांच्या निधनानंतर कुटुंबियांना बर्‍याच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे राम मंदिर भूमी पूजन सोहळ्याचे आमंत्रण आम्हाला मिळायला हवे, असे संजय कुमार यांच्या मुलीने म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.