Share

संघात निवड न झाल्यामुळे शिखर धवनला वडिलांनी सर्वांसमोर लाथा बुक्यांनी चोपले; पहा व्हिडिओ

आयपीएल २०२२ नंतर लगेच भारत विरूध्द दक्षिण आफ्रिका यांच्यात ५ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. या या मालिकेसाठी १८ सदस्यांची टीम इंडियात निवड करण्यात आली आहे. या १८ सदस्यांमध्ये शिखर धवनला स्थान मिळाले नाही. तसेच शिखर धवन(Shikhar Dhawan) सदस्य असलेल्या पंजाब किंग्स संघाला देखील आयपीएल २०२२ ची उपांत्य फेरी गाठता आली नाही.(father beat shikhar dhawan viral video on social media)

यावरून शिखर धवनचे वडील फार संतापले आहेत. त्यांनी शिखर धवनला मारहाण केली आहे. सध्या या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिखर धवनने स्वतःच हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. शिखर धवन आणि त्याच्या वडिलांचा मजेशीर अंदाज या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

या व्हिडिओमध्ये शिखर धवनचे वडील त्याला मारहाण करताना दिसत आहेत. यावेळी काही जण शिखर धवनच्या वडिलांना अडवत असल्याचे देखील व्हिडिओमध्ये दिसत आहेत. तर शिखर धवन वडिलांपासून स्वतःला वाचवत असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळी बॅकग्राऊंडमध्ये अभिनेते अमरीश पुरी यांचा एक डायलॉग ऐकायला मिळत आहे.

या व्हिडिओला शिखर धवनने मजेशीर कॅप्शन दिले आहे. शिखर धवनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “टीममधून नॉक आउट झालो म्हणून वडिलांनी मला नॉक आउट केलं.” या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओला लाखोमध्ये लाइक्स मिळाल्या आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

शिखर धवनने आयपीलच्या यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. तसेच गेल्या ३-४ वर्षांपासून त्याने सातत्याने धावा केल्या आहेत. तरीही शिखर धवनला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. यावरून भारताचा माजी खेळाडू सुरेश रैनाने नाराजी व्यक्त केली होती. “दिनेश कार्तिकने वयाच्या ३७ व्या वर्षी भारतीय संघात स्थान मिळवले आहे तर, शिखर धवनही भारतीय संघात स्थान मिळवण्यास पात्र आहे”, असे सुरेश रैना म्हणाला होता.

भारताचा माजी खेळाडू सुरेश रैना पुढे म्हणाला की, ‘संघात स्थान न मिळाल्यामुळे शिखर निराश झाला असावा. प्रत्येक कर्णधाराला संघात आपल्यासारखा खेळाडू हवा असतो. तो एक मजेदार माणूस आहे जो देशांतर्गत, टी२० किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, तो चांगला खेळतो आणि नेहमी धावा करतो”, असे सुरेश रैनाने सांगितले होते.

शिखर धवन हा आयपीएल २०२२ च्या लिलावात खरेदी केलेला पहिला खेळाडू होता. मेगा लिलावात धवनला पंजाब किंग्जने ८.२५ कोटी रूपयांना खरेदी केले होते. आयपीएलच्या मागील तीन हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. धवन आयपीएल २०२२ मध्ये त्याने १४ सामन्यांमध्ये ३८.३३ च्या सरासरीने ४६० धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या :-
प्लेआॅफमध्ये क्वालिफाय न झाल्याने धवनला पोलिसांसमोर लाथा बुक्क्यांनी मारहाण; व्हिडीओ व्हायरल
नस तपासणारा डॉक्टर ते ह्रदयाला भिडणार कवी, असा होता मजरूह सुलतानपुरी यांचा प्रवास
‘हनुमान चालिसा म्हणाल तर ठार मारू’, नवनीत राणा यांना धमकी; धमकी देणारा कोण? वाचा…

 

ताज्या बातम्या खेळ मनोरंजन

Join WhatsApp

Join Now