बाप रे! पब्जी खेळताना टास्क पूर्ण झाला नाही म्हणून, १९ वर्षाच्या तरुणाने केली आत्महत्या

चंद्रपूर | सध्या देशात कोरोना महामारीचे संकट आणखी वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत.

अशा परिस्थितीत शाळा, कॉलेज बंद असल्याने अनेक शिक्षण संस्थांनी ऑनलाईन अभ्यासक्रमाला सुरुवात केली आहे. यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून घरात बसून असलेल्या तरुण पिढीसाठी मोबाईल हे करमणुकीचे साधन झाले आहे.

अनेक तरुण वर्गाला सध्या पब्जी गेमचे वेड लागले आहे. हा गेम खेळत असताना त्यांचा दिवस कसा जातो हे त्यांनाच कळत नाही. याचा पब्जी गेममुळे चंद्रपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील एका १९ वर्षीय तरुणाने पब्जीमुळे आत्महत्या केली आहे. गौरव पाटेकर असे या तरुणाचे नाव आहे. तो दिवसभर मित्रांसोबत पब्जी गेम खेळत बसत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, पब्जी गेम खेळत असताना एक टास्क पूर्ण होत नसल्यामुळे गौरवला भयंकर नैराश्य आले होते. त्यानंतर त्याने मित्राला फोन करून आत्महत्या करत असल्याचे सांगितले आणि गळफास लावून आपले जीवन संपवले.

मित्रांसोबत पब्जी गेम खेळताना दिवस कसा निघून जात असे, हे देखील गौरवला कळत नसे. मात्र हीच आवडती गेम गौरवच्या मृत्यूचे कारण ठरली आहे. भद्रावती तालुक्यातील माजरी शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.