कोल्हापुरातील हे मुस्लिम कुटुंबीय पुरणपोळी आणि कटाच्या आमटीवर सोडतात रोजाचा उपवास

कोल्हापुर | देशात अनेक धर्माची लोकं राहतात. कुणी हिंदु आहे, कुणी मुस्लिम, कुणी शीख आहे तर कुणी पारशी आहे. सर्वच धर्मांनी मानवतेची शिकवण दिली आहे. माणूसकी हीच माणसाची खरी जात मानली जाते.

देशात अजूनही अशी अनेक लोक आहेत. जी धर्माला मानत नाहीत. सर्व धर्म समभाव ही परंपरा ते जोपासत असतात. कोल्हापुरातही असंच एक मुस्लिम समाजाचं कुटुंब आहे. जे रमजानचा उपवास हिंदु धर्माच्या मित्राकडून देण्यात आलेल्या पुरणपोळी आणि कटाच्या आमटीवर उपवास सोडतं.

कोल्हापुर जिल्ह्यातील पन्हाळा तालूक्यातील दिगवडे गावात राजाराम पवार यांच्या परिवाराने आणि कोल्हापुरात राहणाऱ्या खलीलशेठ मणेर यांच्या परिवाराने हा आदर्श घालून दिला आहे. मैत्रीच्या पुढे कोणताच धर्म नसल्याचं हे कुटुंबीय सांगत आहे.

रमजान महिन्यात मुस्लिम समाजाला शुभेच्छा देण्यात येतात. रमजानचा महिना मुस्लिम समाजासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. या महिन्यात रोजा म्हणजेच उपवास केला जातो. राजाराम पवार आणि खलीलशेठ मणेर यांची जीवाभावाची मैत्री होती.

मैत्री करावी तर मनापासून, जीव लावून करावी हे त्यांच्या मैत्रीतून दिसायचं. रमजानच्या महिन्यात पवार हे मणेर यांच्या घरी गेले. पवार यांनी मणेर यांच्या घरातील सर्वांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. पवार यांनी मित्राला देण्यासाठी ५० पुरणपोळ्या आणि कटाची आमटी आणली होती.

उपवास सोडण्यासाठी मणेर कुटूंबीयांनी मोठी तयारी केली होती. मात्र पवार यांनी म्हटले की उपवास तुम्ही पुरणपोळी आणि कटाच्या आमटीवर सोडायचा. आपल्या जीवाभावाच्या मित्राच्या विनंतीला मान देऊन मणेर कुटूंबीयांनी पुरणपोळी आणि कटाच्या आमटीवर उपवास सोडला.

दर वर्षी रमजानच्या महिन्यात पुरणपोळी आणि कटाची आमटी पवार कुटूंबीयांकडून मणेर कुटुंबाला देण्यात येते. ही परंपरा कधीही खंडीत झाली नाही. काही दिवसांनी राजाराम पवार आणि खलीलशेठ मणेर यांचे निधन झाले.

दोन्ही मित्राच्या निधनानंतरही दोन्ही कुटुंबातील प्रेम कधीच कमी झालं नाही. आजूनही दर वर्षी न चुकता राजाराम पवार यांचा मुलगा संतोष हे मणेर परिवाराला रोजाच्या महिन्याचा उपवास सोडण्यासाठी पुरणपोळी आणि कटाची आमटी पाठवतात.

पवार आणि मणेर या हिंदु मुस्लिम परिवाराने माणूसकी हाच खरा धर्म आहे हे दाखवून दिलं आहे. त्यांच्या या परंपरेने समाजसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे करावे तितके कौतूक कमीच आहे.
महत्वाच्या बातम्या-
डायरेक्टरने रात्री सोबत झोपण्याची ऑफर केल्यावर मराठमोळ्या श्रुती मराठेने काय उत्तर दिले पहा…
कोरोना झाल्यापासून ते बरे होण्यापर्यंत घरच्या घरी कसे घ्यावेत उपचार, जाणून घ्या तज्ञांचा सल्ला
मोठा निर्णय! ठाकरे सरकार राज्यातील नागरीकांना देणार मोफत लस
एका रात्रीत लोकप्रिय झालेली रानू मंडलची आज काय अवस्था झाली बघा, वाचून धक्का बसेल

 

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.