Share

‘काश्मिरी पंडितांवरील हल्ले थांबवायचे असतील तर काश्मीर फाइल्सवर बंदी घाला’ फारूक अब्दुल्लांनी केली मागणी

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी काश्मिरी पंडितांवरील हल्ल्यांचा संबंध ‘काश्मीर फाइल्स'(Kashmir Files) या चित्रपटाशी जोडला आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी यासंदर्भात एक वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामध्ये फारूक अब्दुल्ला यांनी ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.(farukh abdulaa demand to government for banned kashmir files film)

काश्मिरी पंडितांवर होणारे हल्ले थांबवायचे असतील तर सरकारने काश्मीर फाइल्स या चित्रपटावर बंदी घालावी, असं वक्तव्य जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी केलं आहे. “देशात मुस्लिमांविरोधात द्वेषाचे वातावरण आहे. हेच काश्मीरमधील मुस्लिम तरुणांमध्ये संतापाचे मुख्य कारण आहे”, असे देखील फारूक अब्दुल्ला म्हणाले आहेत.

एका मुलाखतीदरम्यान फारूक अब्दुल्ला यांनी हे वक्तव्य केलं आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला म्हणाले की, “काश्मीर फाइल्स हा चित्रपट वास्तवावर आधारित आहे का? असा माझा सरकारला प्रश्न आहे. एक मुसलमान आधी एका हिंदूला ठार मारेल. त्यानंतर रक्ताने माखलेले तांदूळ त्याच्या पत्नीला खाण्यासाठी देईल, हे होऊ शकते का?आपण इतक्या खालच्या दर्जाचे आहोत का?”, असे फारूक अब्दुल्ला यांनी सांगितले आहे.

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला पुढे म्हणाले की, “काश्मीर फाईल्स हा निराधार चित्रपट आहे. या चित्रपटाने देशात केवळ द्वेष निर्माण केला आहे. काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून काश्मिरी पंडितांवरील हल्ले अचानक वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांनी आदेश दिले आहेत.

या आदेशानुसार काश्मिरी पंडितांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. रविवारी जम्मू-काश्मीरमधील लष्कर-ए-इस्लाम या संघटनेने काश्मिरी पंडितांना धमकी दिली होती. काश्मिरी पंडितांनी खोरे सोडावे नाहीतर मरायला तयार व्हावे, असा इशारा लष्कर-ए-इस्लाम या संघटनेने दिला होता. पुलवामा शहरातील काश्मिरी पंडितांना ही धमकी देण्यात आली होती.

काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यापासून काश्मिरी पंडितांच्या परतीचे दावे केले जात होते. पण गेल्या तीन वर्षातील वास्तव फार वेगळे आहे. काश्मिरी पंडित ज्या ठिकाणी वास्तव्यास होते, त्या ठिकाणी काश्मिरी पंडितांना राहण्यासाठी विरोध केला जात आहे. त्याची हत्या केली जात आहे. गेल्या आठवड्यात राहुल भट्ट या काश्मिरी पंडित तरुणाची दहशतवाद्यांनी हत्या केली होती.

महत्वाच्या बातम्या :-
सासू सासऱ्याने लावले विधवा सुनेचे दुसरे लग्न, सर्व खर्चासहित मुलाचा बंगलाही केला तिच्या नावावर
‘ही’ मराठी अभिनेत्री झळकणार साऊथच्या चित्रपटात, बऱ्याच काळानंतर करतेय कमबॅक
SA vs IND सिरीजमधून रोहित शर्माची होणार हाकलपट्टी? हे तीन खेळाडू कर्णधारपदाचे दावेदार

ताज्या बातम्या मनोरंजन राजकारण

Join WhatsApp

Join Now