हटके शेती! एका एकरात १५ लाखाचे उत्पादन १५ मजूर, ४ मजूर फक्त फोन घ्यायला; नगरच्या पठ्ठ्याची गोष्ट..

शेतीमध्ये परवडत नाही, असे अनेकदा सांगितले जाते. तसेच शेतकऱ्यांवर वेगवेगळी संकटे येत असतात. कोरोनातील लाॅकडाउन देखील शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा ठरला. मात्र याकाळात अनेकांनी पैसे देखील कमवले.

आता नेवासे तालुक्यातील फत्तेपूर येथील तरूण शेतकऱ्याने जिद्द आणि कष्टाच्या जोरावर एक एकर शेतीत देशी, परदेशी चारा पीकाच्या माध्यमातून मोठा नफा कमवत आहे. यामुळे या शेतकऱ्याची चर्चा सुरू आहे. या शेतकऱ्याचे शिक्षण अवघे बारावी झाले आहे.

त्याने शेतीतून कमावलेले नफा पाहून आयटी कंपन्यांतील तगड्या पॅकेजवाल्यांचेही डोळे पांढरे होतील. शेती करावी तर अशी. या आशयाची पोस्ट या तरूण शेतकऱ्याच्या समर्थनार्थ सोशल मीडियातून फिरत आहे. अनेकजण या शेतकऱ्याचे कौतुक करत आहेत.

येथील सोमेश्वर श्रीधर लवांडे या युवकाने सुरुवातीला शनिशिंगणापूर येथे व्यावसाय केला. कंपनीत कामही केले मात्र त्यांचे मन तेथे लागत नव्हते. यामुळे त्यांनी वेगळ्या पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांना थायलंडमधील विकसित फोर जी बुलेट सुपर नेपियर या चारा पिकांची माहिती मिळाली.

हेच पीक आपल्याकडील पारंपरिक गिनी आणि इतर चारा पिकांना फाटा देईल. कमी काळात अधिक उत्पादन आणि दूधासाठी सकस असलेला हा चारा दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या पसंतीस उतरला आहे. त्यांनी इंडोनेशिया, बांगलादेश, ऑस्ट्रेलियातील चारा वाणांची लागवड देखील केली आहे.

त्यांनी विकसित केलेल्या बियाण्यास इंडोनेशियाचा बाहुबली असे नाव देण्यात आले. त्यांनी घास, कडवळ, सुबाभुळ, दशरथ व राय घासाचे बियाणे तयार करून विक्री सुरु केली आहे. बियाण्यास देशभरातून ऑनलाईन मागणी वाढल्याने त्यांनी गावातील इतरांची शेती कराराने घेवून चारा लागवड केली आहे.

त्यांना एका वर्षात एक एकर शेतीतून पंधरा लाखाचा नफा मिळाला आहे. त्यांनी परदेशात हे बियाणे विकले आहे. देशभरातून फोन घेण्यासाठी त्यांच्याकडे चार कामगार आहे. १५ मजूर त्यांच्याकडे काम करतात.

ताज्या बातम्या

योगी सरकारचा निर्णय, भाजप कार्यकर्त्यांविरोधातील ५ हजाराहून अधिक खटले मागे घेणार

पत्नी कोरोनाची लस घेण्यासाठी जाताच पती चढला झाडावर; कारण वाचून हैराण व्हाल

VIDEO; पप्पीसाठी प्रियकरानं स्त्यावरच मांडला ठाण, शेवटी तरुणीनं भर रस्त्यात केलं असं काही की…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.