शेतकऱ्यांना शेण आणि सेंद्रीय कचऱ्यापासून मिळणार पैसे; वाचा काय आहे सरकारची योजना

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशात ५००० बायोगॅस प्लांट उभे करणार असल्याचं जाहीर केलं आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेण आणि सेंद्रीय कचऱ्यापासून ५ वर्षात १ लाख कोटी  पैसे मिळवण्यास मदत होणार आहे. देशात सीएनजीवर चालणाऱ्या ट्रॅक्टर लॉन्च कार्यक्रमावेळी त्यांनी गोबरधनला चालना मिळणार असल्याचं म्हटलं आहे.

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत ही योजना सूरू केली आहे. शेतकरी शेण आणि सेंद्रीय कचरा बायोगॅस प्लांटला विकून पैसे कमावू शकतील आणि  खेड्यांमध्ये स्वच्छताही राखण्यास मदत होईल.

पंजाब आणि हरियाणामध्ये पेंढीची समस्या तीव्र होताना दिसत आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून मार्च महिन्यात बायोगॅस प्लांट तयार करण्यात येणार आहे. यामध्ये दिवसाला ३०० टन बायोगॅस सीएनजी तयार होईल. तसेच हरियाणामध्येही ६४ प्लांट उभारण्यात येणार आहेत. हे प्लांट उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून मार्गदर्शन केले जाणार आहे्.

आतापर्यंत ६५० उद्योजकांनी प्लांट उभारण्यासाठी तयारी दर्शवली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कर्ज योजना सूरु केली जाणार आहे. या प्लांटमध्ये गॅस तयार झाल्यानंतर ४६ रूपये प्रतिकिलो दराने प्लांटमधून तेल कंपन्या गॅस खरेदी करणार आहेत.

कृषी मंत्रालय आणि पशूधन मंत्रालयाकडून इच्छूक उद्योजकांसाठी पोर्टलही उभं करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्लांट उभं करण्याविषयी माहिती मिळेल. सरकारडूनही प्लांट उभा करण्यासाठी अर्थसाहय्य दिलं जाणार असल्यानं याचा फायदा उद्योजकांनाही होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
Reliance jio ची धमाकेदार ऑफर, फक्त १५५ रूपयांमध्ये मिळणार इतका डेटा
गूगल मॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच इस्त्रो आणणार स्वदेशी मॅप; जाणून घ्या फायदे
व्हा अधिक स्मार्ट! मोबाइलमध्येच बाळगा आपले आधारकार्ड; जाणून घ्या सविस्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.