अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यातील देऊरवाडा येथील एक शेतकरी सोमवारपासून बेपत्ता आहे. तसेच त्याने आत्म.हत्या करणार असल्याची चिठ्ठी लिहाली आहे. तसेच त्याचा मोबाईल फोनही घरीच आहे. त्याच्या पत्नीने ‘माझ्या पतीने आत्म.हत्या केली तर राज्यमंत्री बच्चू कडू जबाबदार असतील’ असा गंभीर आरोप केला आहे.
त्या शेतकऱ्याचे नाव विजय सुखदेव सुने असे असून वय ४० वर्षे आहे. हा शेतकरी सोमवारी रात्रीपासून बेपत्ता आहे. तो आत्म.हत्येच्या उद्देशाने घर सोडत असल्याची चिठ्ठी सापडली आहे. “माझ्या पतीने आत्म.हत्या केली तर राज्यमंत्री बच्चू कडू, त्यांचे खासगी सचिव, तहसीलदार, ठाणेदार, बिट जमादार हे जबाबदार राहतील.” अशी तक्रार संबंधित शेतकऱ्याची पत्नीने शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यात दिली आहे.
या शेतकऱ्याची पत्नी वैशाली सुने यांनी पोलिसांच्या सततच्या धमकीने वैतागल्याचा उल्लेख पतीने चिठ्ठीत केला आहे अशी तक्रार केली आहे. ‘माझ्या पतीने जर आत्म.हत्या केली तर याला ठाणेदार सचिन परदेशी, बिट जमादार तायडे यांना जबाबदार धरुन खुनाचा गुन्हा दाखल करावा.” असे शेतकऱ्याच्या पत्नीचे म्हणणे आहे.
याशिवाय चांदूरबाजार येथील तहसीलदार धीरज थुल, राज्यमंत्री बच्चू कडू आणि त्यांचे खाजगी सचिव दीपक भोंगाडे यांच्या नावाचा उल्लेखही तक्रारी करण्यात आला आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांचे नाव आल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे.
धनंजय मुंडेंवर बला.त्काराचे आरोप करणारी रेणू शर्मा आहे तरी कोण? घ्या जाणून
भाजपाचा मुख्यमंत्र्यांना इशारा; धनंजय मुंडेंचा त्वरित राजीनामा घ्या, अन्यथा….
…तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही; किरीट सोमय्या बरसले