‘शेतकरी अतिरेकी आहेत, तर मोदींनी त्यांच्यापुढे पांढरे निशाण का फडकवले? शेवटी अहंकार पराभूत झाला’

मुंबई । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मोठा निर्णय घेतला. नरेंद्र मोदींनी कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा मोठा विजय झाला आहे. या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घरी परतण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे.

असे असताना आता सामनामधून शिवसेनेने मोदींवर जोरदार टीका केली आहे. हा अहंकाराचा पराभव आहे, शेतकरी लढत राहिले, शहीद झाले व शेवटी जिंकले. 13 राज्यांतील पोटनिवडणुकांत भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यातून आलेलं हे शहाणपण आहे. शेतकरी खलिस्तानवादी अतिरेकी होते तर मग पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यापुढे पांढरे निशाण का फडकवले?, असा प्रश्नही शिवसेने उपस्थित केला आहे.

शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झालाच आहे. मागे हटणार नाही असे सांगणाऱ्यांचा अहंकार पराभूत झाला, पण आताही अंध भक्त बोलतील, ‘काय हा साहेबांचा मास्टर स्ट्रोक! असा टोला शिवसेनेने लगावला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

या आंदोलनात लोकांनी प्राणाची आहुती दिली, शेतकरी मागे हटले नाही. शेवटी सरकारला कायदा रद्द करावा लागला. 7 वर्षांत मोदींनी कधीही पाय मागे घेतला नाही. आता, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील निवडणुका समोर आहेत. त्यामुळेच, पराभवाच्या भीतीने मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, हे तीन कायदे मागे घेण्यासाठी शेतकरी संघटनांनी बराच काळ आंदोलन केले होते. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान तीनही वादग्रस्त कायदे संसदेद्वारे मागे घेतले जातील. मोदींनी शेतकऱ्यांना शेतात परत जाण्याचे आवाहनही केले आहे.

मोदींनी हे कायदे मागे घेण्याची घोषणा केली असली तरी मोदींवर टीका होत आहे. अनेक शेतकऱ्यांचे जीव या आंदोलनात गेले आहेत. अजून शेतकरी आंदोलन करत आहेत. अधिवेशनात याबाबत निर्णय होणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.